इंडोनेशियातील भूकंप बळींची संख्या 380 वर

मातरम – इंडोनेशियात लोम्बोक बेटावर झालेल्या भूकंपातील बळी गेलेल्यांची संख्या आता 380 वर गेली आहे. या भूकंपामुळे हजारो लोक बेघर झाले असून त्यांच्या अन्नपाण्याची सुविधा अजून पुर्ण होणे बाकी आहे. या खेरीज जखमींचीही संख्या मोठी असून त्यांच्यावर बाहेरून वैद्यकीय पथके मागवून उपचार केले जात आहेत.

गेल्या रविवारी लोम्बोक बेटाला भुकंपाचा धक्का बसला होता. त्याची तीव्रता 6.9 रिश्‍टर स्केल इतकी होती. भुकंपामुळे घरांची जी पडझड झाली आहे त्याचे अनेक ढिगारे अजून उपसणे बाकी आहे त्यामुळे मृतांचा आकडा अजून वाढण्याची भीतीही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. एकूण 3 लाख 87 हजार लोक यात बेघर झाले असून जखमींची संख्या जवळपास 13 हजारांच्या आसपास आहे.

-Ads-

हजारो लोक आजही रस्त्यावर झोपत असून त्यांनी तेथेच आपला संसार मांडला आहे. या भूकंपाचा धक्का शेजारच्या बाली बेटालाहीं बसला असून तेथील दोन जण यात ठार झाले आहेत


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)