इंडोनेशियातील बळींचा आकडा 832 वर 

जकार्ता: इंडोनेशियातील सुलासेवी बेटाला 7.5 रिश्‍टर स्केलचे भूकंपाचे धक्‍के बसल्याने आतापर्यत यात 832 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच याठिकाणी त्सुनामी आली असून त्यामुळे मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. या बेटावर 10 फूट उंचीच्या लाटा आल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले.
या लाटांचा जोर इतका जास्त होता की त्यामुळे पाणी इमारतींमध्ये शिरले. याठिकाणी असलेल्या पालू या प्रांतातील लोकांना या त्सुनामीचा मोठा फटका बसला असून अनेक घरे यामध्ये उद्‌ध्वस्त झाली आहेत. त्सुनामीचा जोर जास्त असल्याने त्यात अनेक घरे वाहून गेली आहेत. त्यातच अनेकांचा मृत्यू झाला. पालू भागातील लोकांच्या मदतीसाठी इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथून सैन्यदल आणि इतर यंत्रणा पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.
या दुर्घटनेमध्ये काही परदेशी नागरिकही बेपत्ता झाले आहेत. याठिकाणी मोठ्या स्तरावर बचावकार्य सुरु असून प्रतिकूल परिस्थितीमुळे या मदतकार्यात अडचणी येत असल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. ज्या पालू भागाला या त्सुनामीचा फटका बसला आहे तेथील लोकसंख्या अवघी तीन लाख आहे. मृत नागरिकांबरोबरच असंख्य लोक जखमी झाले आहेत, तर बरेच जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्‍यत आहे. त्सुनामीचा वेग मोठा असल्याने येथील वीजपुरवठा आणि दूरध्वनी यंत्रणा बंद पडली आहे, त्यामुळेही मदतकार्यात अडचणी येत आहेत.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)