इंडोनेशियाच्या जावा बेटावरील भूस्खलनात 15 ठार, 20 बेपत्ता

जकार्ता (इंडोनेशिया): इंडोनेशियाच्या जावा बेटावरील भूस्खलनात 15 ठार, 20 बेपत्ता असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. बचावकर्मींनी आज आणखी सहा मृतदेह चिखलातून बाहेर काढल्याने मृतांची संख्या 15 झाली आहे. हे सहा मृतदेह चिखलात 4 मीटर्स (13 फूट) खोल पुरले गेले होते. अजूनही 20 जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले आहे.

सोमवारी संध्याकाळच्या सुमारास झालेल्या भूस्खलनात पश्‍चिम जावाच्या सुकाबुमी जिल्ह्यातील सिरनारेस्मी गावातील 30 घरे पूर्णपणे गाडली गेली. यातून वाचलेल्या आणि बेघर झालेल्या 60 जणांना तात्पुरत्या निवारा केंद्रांत आश्रय देण्यात आल्याची माहिती एनडीएमए(नॅशनल डिझॅस्टर मिटिगेशन एजन्सी) चे प्रवक्ते सुतोपो पुरवो न्युग्रोहो यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भूस्खलनाने नष्ट झालेले रस्ते, मुसळधार पाऊस आणि अंधार यामुळे मदत कार्यात अडथळा येत आहे. त्या ठिकाणी हेवी मशीनरी नेणे मुश्‍किल झाले असल्याचे न्युग्रोहो यांनी सांगितले. मोठ्या मुश्‍किलीने पोहचलेल्या दोन एक्‍स्केव्हेटर्सच्या साह्याने चिखलात गाडले गेलेल सहा मृतदेह बाहेर काढले आहेत. त्यांच्याबरोबर चार जखमींनाही वाचवण्यात आले, त्यापैकी एका बालकाचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. अंधार आणि पावसामुळे मदतकार्य रात्री थांबवावे लागले असल्याचे मदत कार्य प्रमुख मादे ओका अस्तावा यांनी सांगितले.

अलीकडच्या काळातील पाऊस आणि मोठी भरती यामुळे भूस्खलनाच्या डझनावर घटना घडल्या आहेत. 22 डिसेंबर रोजीचा अनक क्राकाटो ज्वालामुखीचा उद्रेकामुळे आलेल्या सुनामीत जावा व सुमात्रा बेटांवर किमान 437 जण मरण पावले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)