इंडोनेशियाची भारताला सबांगची “भेट’ आणि चीनला “टेन्शन’

जकार्ता (इंडोनेशिया) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंडोनेशिया दौऱ्यापूर्वीच इंडोनेशियाने भारताला सबांग बंदराची भेट दिलेली आहे आणि भारताला भेट देऊन चीनचे टेन्शन वाढवले आहे. इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगपूर या तीन देशांच्या दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी इंडोनेशियचा दौरा खास आहे. इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी इंडोनेशियाला गेले आहेत.

इंडोनेशियाने सामरिक दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या आपल्या सबांग बंदराच्या आर्थिक आणि लष्करी वापरासाठी भारताला परवानगी दिली आहे. भारताला दिलेली ही परवानगी चीनसाठी मोठा धक्का आहे. कारण या बंदरावर चीनची नजर होती.

अंदमान निकोबाऱ्‌ द्वीपसमूहापासून 710 किमी अंतरावर असलेले सबांग बंदर सुमात्रा बेटाच्या उत्तर टोकाला आहे. भारत सबांग बंदरात गुंतवणूक करणार आहे. सामरिक आणि आर्थिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या या मार्गावरून कच्च्या तेलचीही वाहतूक होते. याच मार्गवरून भारताचा 40 टक्के सागरी व्यापार होतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
102 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
2 :heart_eyes:
14 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)