“इंडियाज मोस्ट वॉन्टेड’साठी अर्जुन कपूरचा “हटके लुक’

अर्जुन कपूरने अलिकडेच परिणिती चोप्राबरोबर मिळून “नमस्ते इंग्लंड’चे शुटिंग पूर्ण केले आहे. आता तो राजकुमार गुप्ताच्या “इंडियाज मोस्ट वॉन्टेड’मध्ये लीड रोल करतो आहे. “,,,मोस्ट वॉन्टेड’चे शुटिंग सुरू झाले आहे आणि त्यासाठी अर्जुन कपूरने आपल्या लुकमध्ये कमालीचा बदल केला आहे. हा लुक बघितल्यावर अर्जुन कपूरला पटकन ओळखणेही शक्‍य होणार नाही. त्याने स्वतःच हा नवीन लुक शेअर केला आहे.

“इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ ची कथा 2012 ते 2014 दरम्यानच्या एका सत्यकथेवर आधारित आहे. हे एक सीक्रेट ऑपरेशन असणार आहे. रविंद्र कौशिक नावाच्या एका कलाकाराला लखनौतल्या इंटिलिजन्स अधिकाऱ्यांनी खास ट्रेनिंग देऊन पाकिस्तानमध्ये पाठवण्यात आले होते. त्याने पाकिस्तानमधील सैन्यात क्‍लार्कची नोकरी मिळवली आणि भारतीय लष्करासाठी हेरगिरीही केली होती. पण तो पकडला गेला.

तुरुंगात असतानाच त्याचा मृत्यू झाला होता. राजकुमार गुप्ता या सिनेमाचे डायरेक्‍शन करत आहे. अर्जुनचा “नमस्ते इंग्लंड’ हा “नमस्ते लंडन’च्याच धर्तीवरील सिनेमा असणार आहे. याच वर्षी दसऱ्याच्या मुहुर्तावर “नमस्ते इंग्लंड’ रिलीज होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)