‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’ हा रियॅलिटी शो सध्या  खूप चर्चेत आहे. त्याचे कारण म्हणजे यामध्ये अभिनय करणारे लहानगे. यामधील लहानगे हे अभिनयामध्ये कसलेल्या अभिनेत्यांना देखील पाणी पाजतील. प्रत्येक शनिवारी आणि रविवारी ते आपली कला सादर करतात आणि वाहवाही मिळवतात.

या लहान  ड्रामेबाज कलाकारांचे  जीवन काही सोपे नाही. त्यातील काही कलाकारांनी खूप आपल्या खाजगी जीवनात खूप संघर्ष पहिला आहे. त्यातीलच एक म्हणजे दीपाली बोरकर. तिचा अभिनय हा खूप वाखाणण्याजोगा आहे. त्यातही तिने नुकताच शूट केलेला शिव आणि भस्मासुर यांची कथा प्रस्तुत करत दर्शकांसमोर जबरदस्त अभिनयाचा नमुना सादर केला.

या अभिनयानंतर तिचे सर्वजण कौतुक करत होते. त्यात त्या शोचे तिन्ही ‘जज’ देखील कौतुक करत होते. त्यानंतर तिची आई तिथे आली आणि तिने आपल्या संघर्षाची कहाणी सांगितली. ओमंग कुमार यांनी मंचावर येऊन दीपालीला आपण पुढील चित्रपटात घेणार अशी घोषणा केली. त्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी तिला ‘सायनिंग अमाऊंट’ देखील दिली आहे.  एक वर्षापर्यंत दिपालीच्या घराचा किराया देखील देण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)