इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: प्ले ऑफसाठी ब्लास्टर्सला चमत्काराची गरज

कोची: केरळा ब्लास्टर्सच्या हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमात प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या आशांना जमशेदपूरने धक्का दिला असून मंगळवारी झालेल्या सामन्यात जमशेदपूर एफसीविरुद्ध त्यांना 1-1 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागल्याने प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांना एखादा चमत्कार घडण्याची आशा बाळगावी लागणार आहे.

मोसमाच्या सुरूवातीला ब्लास्टर्सने एटीकेला पराभूत केले होते. मात्र, त्यानंतर त्यांना निर्णायक विजय हुलकावणी देत आला आहे. घरच्या मैदानावरही यापेक्षा वेगळे काही घडले नाही.

65व्या मिनिटाला जमशेदपूरच्या टीम कॅहीलला लांबून पास मिळाला, तो घोडदौड करीत असतानाच केरळा ब्लास्टर्सचा गोलरक्षक धीरज सिंग पुढे सरसावला. त्याने कॅहीलला फाऊल केले. हे बॉक्‍सबाहेर घडले होते, पण पंच राहुलकुमार गुप्ता यांनी जमशेदपूरला पेनल्टी बहाल केली. हा निर्णय ब्लास्टर्ससाठी काहीसा कठोर होता, त्यातच धीरजला यलो कार्डलाही सामोरे जावे लागले. पेनल्टीची सुवर्णसंधी कार्लोस कॅल्वोने सत्कारणी लावली. त्याने नेटच्या डाव्या कोपऱ्यात चेंडू मारत जमशेदपूरचे खाते उघडले.

यानंतर ब्लास्टर्सने 77व्या मिनिटाला बरोबरी साधली. अथक प्रयत्नांचे फळ त्यांना मिळाले. स्लावीसा स्टोयानोविच याने हेडिंगवर डुंगलच्या दिशेने चेंडू मारला. त्यावेळी नेटसमोर बरीच चुरस निर्माण झाली होती. त्यात डुंगलने शिताफीने सफाईदार फटका मारत गोल करत ब्लास्टर्सचे खाते उघडत त्यांना आवश्‍यक असणारी बरोबरी साधून दिली.
सामन्यात दोन्ही संघांची सुरवात सावध होती. पहिला प्रयत्न ब्लास्टर्सने सातव्या मिनिटाला केला. साहल अब्दुल समादने बचाव फळीच्या मागे स्लावीसा स्टोयानोविच याला पास दिला. त्याने दोन प्रतिस्पर्ध्यांना भेदत सुंदर पास दिला होता, पण स्लावीसाचा फटका स्वैर होता.

जमशेदपूरचा बचावपटू रॉबीन गुरुंगने 12व्या मिनिटाला स्लावीसाला अकारण फाऊल केले. त्यामुळे ब्लास्टर्सला फ्री किक मिळाली. गोलक्षेत्रात मिळालेली ही फ्री किक झकीर मुंदामपारा याच्यामुळे वाया गेली. त्याने मारलेला चेंडू थेट खेळाडूंच्या भिंतीवर (प्लेयर्स वॉल) धडकला.

तर, स्लावीसाने 19व्या मिनिटाला मैदानावर घसरत गुरुंगला पाडले. त्यामुळे त्याला यलो कार्डला सामोरे जावे लागले. तेव्हा दोघांची चूक होती, पण स्लावीसाचा धसमुसळा खेळ पाहता गुरुंगला दुखापत होऊ शकली असती. त्यामुळे त्यालाच कार्ड दाखविण्यात आले होते.

त्या नंतर ब्लास्टर्सच्या केझीरॉन किझीटोने 21व्या मिनिटाला मध्य क्षेत्रापासून घोडदौड सुरु करीत बॉक्‍समध्ये प्रवेश केला. त्याला रोखण्यासाठी जमशेदपूरचा प्रयत्न सुरु होता. त्याचवेळी त्याने मैदानालगत समादला पास दिला. समादने मारलेल्या जोरदार फटक्‍यावर जमशेदपूरचा गोलरक्षक सुब्रत पॉल चकला होता, पण त्याच्या सुदैवाने चेंडू बारला लागला.

टिरीने 27व्या मिनिटाला माहमिंगथांगाला उत्तम पास दिला होता. त्यातून टीम कॅहीलला पायापाशी चेंडू मिळाला, पण अनास एडाथोडीकाने कडेकोट मार्किंग केले होते. त्यामुळे चेंडू बाहेर जाऊन गोलकीक मिळाली. कॅहीलचा तेव्हा कॉर्नरचा दावा होता, पण अखेरीस चेंडू त्याला लागला होता.

जमशेदपूरला 34व्या मिनिटाला मेमोने तारले. हालीचरण नर्झारीने डावीकडून अप्रतिम फटका मारत सुब्रतला चकविले होते. सुब्रतने झेपावत चेंडू थोपविला, पण हा चेंडू सैमीनलेन डुंगल याच्यापाशी गेला. डुंगलने मारलेला फटका मात्र मेमोने ब्लॉक केला. दोन्ही संघांची सुरवात सावध होती. पहिला प्रयत्न ब्लास्टर्सने सातव्या मिनिटाला केला. साहल अब्दुल समादने बचाव फळीच्या मागे स्लावीसा स्टोयानोविच याला पास दिला. त्याने दोन प्रतिस्पर्ध्यांना भेदत सुंदर पास दिला होता, पण स्लावीसाचा फटका स्वैर होता. 12व्या मिनिटाला जमशेदपूरचा बचावपटू रॉबीन गुरुंगने स्लावीसाला अकारण फाऊल केले. त्यामुळे ब्लास्टर्सला फ्री किक मिळाली. गोलक्षेत्रात मिळालेली ही फ्री किक झकीर मुंदामपारा याच्यामुळे वाया गेली. त्याने मारलेला चेंडू थेट खेळाडूंच्या भिंतीवर (प्लेयर्स वॉल) धडकला. दरम्यान, फ्री किकनंतर मायकेल सुसैराज याला मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे मैदान सोडावे लागले. त्याच्या जागी जेरी माहमिंगथांगा याला पाचारण करण्यात आले. स्वावीसाने 19व्या मिनिटाला मैदानावर घसरत गुरुंगला पाडले. त्यामुळे त्याला यलो कार्डला सामोरे जावे लागले. तेव्हा दोघांची चूक होती, पण स्लावीसाचा धसमुसळा खेळ पाहता गुरुंगला दुखापत होऊ शकली असती. त्यामुळे त्यालाच कार्ड दाखविण्यात आले. ब्लास्टर्सच्या केझीरॉन किझीटोने 21व्या मिनिटाला मध्य क्षेत्रापासून घोडदौड सुरु करीत बॉक्‍समध्ये प्रवेश केला. त्याला रोखण्यासाठी जमशेदपूरचा प्रयत्न सुरु होता. त्याचवेळी त्याने मैदानालगत समादला पास दिला. समादने मारलेल्या जोरदार फटक्‍यावर जमशेदपूरचा गोलरक्षक सुब्रत पॉल चकला होता, पण त्याच्या सुदैवाने चेंडू बारला लागला.

टिरीने 27व्या मिनिटाला माहमिंगथांगाला उत्तम पास दिला होता. त्यातून टीम कॅहीलला पायापाशी चेंडू मिळाला, पण अनास एडाथोडीकाने कडेकोट मार्किंग केले होते. त्यामुळे चेंडू बाहेर जाऊन गोलकीक मिळाली. कॅहीलचा तेव्हा कॉर्नरचा दावा होता, पण अखेरीस चेंडू त्याला लागला होता.

मशेदपूरला 34व्या मिनिटाला मेमोने तारले. हालीचरण नर्झारीने डावीकडून अप्रतिम फटका मारत सुब्रतला चकविले होते. सुब्रतने झेपावत चेंडू थोपविला, पण हा चेंडू सैमीनलेन डुंगल याच्यापाशी गेला. डुंगलने मारलेला फटका मात्र मेमोने ब्लॉक केला. मध्यंतरास गोलशून्य बरोबरी होती. निर्धारीत वेळ संपण्यास दोन मिनिटे बाकी असताना जमशेदपूरचा बदली खेळाडू फारुख चौधरीने उजवीकडून मुसंडी मारत जोरदार फटका लगावला, पण धीरजने योग्य जागी थांबत चपळाईने बचाव केला.

दहा सामन्यांत ही त्यांची सहावी बरोबरी असून एक विजय व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे नऊ गुण झाले. त्यांचा सातवा क्रमांक कायम राहिला. सध्या मुंबई सिटी एफसी 17 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे ब्लास्टर्स जवळपास निम्या गुणांनी मागे आहे. जमशेदपूरने 11 सामन्यांत सातवी बरोबरी साधली असून तीन विजय व एक पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 16 गुण झाले. जमशेदपूरने पाचवे स्थान कायम राखले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)