नवी दिल्ली : तेल कंपन्यांमधील आघाडीची कंपनी असणाऱ्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने जानेवारी-मार्च २०१८ या तिमाहीमध्ये पाच हजार २१८ कोटी रुपयांचा नफा नोंदविला आहे. या कंपनीच्या नफ्यात वर्षभरात तब्बल ४० टक्क्यांची वाढ झाली असून गेल्या वर्षी याच तिमाहीमध्ये या कंपनीला तीन हजार ७२० कोटी रुपयांचा नफा झाला होता. जानेवारी-मार्च २०१८च्या तिमाहीत या कंपनीच्या महसुलाने १.३७ लाख कोटी रुपयांवर झेप घेतली आहे. या कंपनीचे प्रतिबॅरल अॅव्हरेज ग्रॉस रिफायनिंग मार्जिन ८.४९ अमेरिकी डॉलर नोंदविले गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)