इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याचा फोन

मुंबई – इंडिगोच्या मुंबई-दिल्ली विमानात बॉम्ब असल्याचे फोन आल्याने एकच गोंधळ उडाला. विमानातील सर्व प्रवाशांना उतरवून कसून तपासणी करण्यात आली. सुरक्षा दलांनी विमानाला सुरक्षित घोषित केले आहे. दरम्यान, इंडिगोकडून अद्यापही कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

इंडिगोचे  6E3612  हे विमान मुंबईहून दिल्लीला जाणार होते. यावेळी एका महिलेने विमानात बॉम्ब असल्याची माहिती दिली. यानंतर विमानाची कसून तपासणी करण्यात आली. परंतु, तपासात काहीच आढळून आले नाही. दरम्यान, माहिती देणाऱ्या महिलेने काही व्यक्तींची छायाचित्रे दाखवत ती देशासाठी खतरा असल्याचा दावा केला आहे. सध्या पोलीस त्या महिलेची कसून चौकशी करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)