इंटिमेट सीनलाही कोरिओग्राफ करायला हवे- कल्की

इंटिमेट सीनच्या शुटिंगच्यावेळी कलाकार जर आपल्या पार्टनरवर विश्‍वास ठेवू शकला नाही, तर सीनमध्ये जिवंतपणा येऊ शकणार नाही. त्यासाठी इंटिमेट सीन करणाऱ्या दोन्ही कलाकारांनी एकमेकांवर पूर्ण विश्‍वास ठेवणे आवश्‍यक आहे. बॉलीवूडमधील इंटिमेट सीनच्या शुटिंगच्यावेळी असा विश्‍वास असणे अनिवार्य असायला पाहिजे, असे मत कल्की कोचलीनने व्यक्‍त केले आहे. आपण काही अशा कलाकारांबरोबर इंटिमेट सीन केले आहेत, ज्यांची पूर्वी कधीही भेटही झाली नव्हती. असे होता कामा नये, असेही ती म्हणाली.

जेव्हा आपण एखाद्या सिनेमाच्या सेटवर असतो, तेंव्हा अॅक्‍शन सीन कोरिओग्राफर शिवाय कोणीही करत नाही. पण म्हणून चुकूनही हिरोच्या चेहऱ्यावर पंच मारला जाऊ शकत नाही. मग इंटिमेट सीनसाठी कोरिओग्राफ का केले जाऊ शकत नाही. त्यासाठीच इंटिमेट सीन करण्यासाठी कलाकारांचा एकमेकांवर पूर्ण विश्‍वास असणे आवश्‍यक आहे, असे कल्की म्हणाली. एका चर्चासत्रादरम्यान तिने आपली स्पष्ट मते मांडली.

सिनेसृष्टीमध्ये काही गोष्टी जाणीवपूर्वक अंतर्भूत करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी लेखी आचारसंहिता देखील असायला पाहिजे, असेही तिला वाटते. ती सध्या एका नाटकामध्ये काम करते आहे. त्यासाठी अशी दोन पानी आचारसंहिता तयार केली गेली होती. या वर्षभरात “मी टू’ ची अनेक उदाहरणे उजेडात आली आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर ही सतर्कता बाळगली गेल्याचेही तिने सांगितले.

ती ज्या नाटकात काम करते आहे, त्यात रोमन साम्राज्यातील एका महिलेवर बलात्कार झाल्याचे कथानक आहे. तिच्या बरोबरच्या कलाकाराने तिच्याशी सर्व चर्चा करून आपली देहबोली ठरवली. दोघांच्या सहमतीने त्या अवघड दृश्‍याची मांडणी केली गेली. त्यामुळे एक प्रकारचे तणावरहित वातावरण निर्माण झाले. यातून विश्‍वासार्हता वाढते. त्यामुळे दृश्‍य परिणामकारक करण्यासाठी सुधारणा काय करायच्या याचा विचार करण्यासही वाव मिळतो. हे दृश्‍य म्हणजे एकप्रकारची सामूहिक जबाबदारी आहे, याचे भानही वाढीस लागते, असे ती म्हणाली. हिंदीबरोबर इंग्लिश स्टेजवर काम करणाऱ्या कल्कीने मांडलेले हे मत बॉलीवूडमध्ये आतापर्यंत क्‍वचितच स्वीकारले गेले असावे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)