इंटरपोलचे चीनमधील प्रमुख आठवड्याभरापासून बेपत्ता

फ्रान्सकडून तातडीने तपासाला सुरुवात

बिजिंग: इंटरनॅशनल पोलीस ऑर्गनायझेशनचे (इंटरपोल) चीनमधील प्रमुख मेंग होंगवाई हे गेल्या आठवड्यापासन बेपत्ता झाले आहेत. अठवडा उलटूनही त्यांचा ठावठिकाणा लागला नसल्याने आता फ्रेंच पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. चौकशी करणाऱ्या पथकातील सुत्रांनी ही माहिती दिल्याचे एएफपी या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

आग्नेय फ्रान्समधील इंटरपोलच्या लिऑन येथील मुख्यालयातून चीनकडे जाण्यासाठी निघालेले मेंग गेल्या आठवड्यापासून बेपत्ता आहेत. त्यांच्या पत्नीने ते बेपत्ता असल्याची तक्रारही स्थानिक पोलिसांत नोंदवली आहे. युरोपच्या प्रशासनाच्या माहितीनुसार, मेंग 29 सप्टेंबर रोजी युरोप सोडून चीनकडे जाण्यासाठी रवाना झाले. दरम्यान, ते फ्रान्समध्येही दिसून आले नसल्याचे एएफपीने सांगितले आहे. 2020पर्यंत मेंग चीन मधील इंटरपोलच्या प्रमुखपदी कार्यरत असणार आहे.

नोव्हेंबर 2016 मध्ये इंटरपोलच्या चीनमधील प्रमुखपदी निवड होण्यापूर्वी मेंग हे चीन सरकारमधील सार्वजनिक सुरक्षा विभागाचे उपमंत्री होते. या काळात त्यांनी गुप्तहेरांवर मोठा अंकुश राखला होता. मेंग हे पहिले चीनमधील इंटरपोलचे अधिकारी राहिले आहेत. त्यामुळे इंटरपोलच्या 192 देशांतील कायदा अंमलबजावणी संस्थेशी ते जोडले गेले होते.
मेंग यांची इंटरपोलच्या प्रमुखपदी निवड झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाच्या मदतीने राष्ट्रपती शी. जिनपिंग यांनी सुरु केलेल्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेंतर्गत देशातील आर्थिक घोटाळेबाज, भ्रष्ट अधिकाऱ्यांना पकडणे शक्‍य होईल, असे बीजिंगमधील एका अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)