इंटरपोलचे अध्यक्षच झाले बेपत्ता ; चीन सरकारनेच ताब्यात घेतले असण्याची शक्‍यता 

पॅरीस: आंतरराष्ट्रीय पोलिस संघटना म्हणून ज्या संस्थेचा उल्लेख केला जातो त्या इंटरपोलचे अध्यक्ष मेंग हॉंगवेई हे बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. ते फ्रांसहून आपल्या मायदेशी म्हणजेच चीनला यायला निघाले. विमानातून ते चीन मध्ये उतरलेही पण त्यांचा त्यानंतर मात्र ठावठिकाणा लागलेला नाही. गेल्या सप्टेंबर महिन्यापासून ते बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. त्यांच्या पत्नीने म्हटले आहे की गेल्या सप्टेंबर पासून मी आपल्या पतींशी फोनवर सुद्धा संपर्क करू शकलेले नाही. ते केवळ इंटरपोलचे अध्यक्षच नाहीत तर चीनचे एक मंत्रीही आहेत. त्यांच्याकडे सार्वजनिक सुरक्षा खात्याचे उपमंत्रीपद आहे. इंटरपोलचे मुख्यालय फ्रांसमध्ये लियॉन येथे आहे. त्यांनीही आपले अध्यक्ष बेपत्ता आहेत असे नमूद केले आहे.
त्यांचा ठावठिकाणा शोधण्याची जबाबदारी आता मुख्यत्वे फ्रांस आणि चीन या दोन देशांवर आहे. शुक्रवारपासून फ्रांसने त्यांच्या बेपत्ता होण्याच्या प्रकाराची चौकशी सुरू केली आहे. दरम्यान हॉंगकॉंग मधील एका वृत्तपत्राने अशी बातमी दिली आहे की चीन मध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात आता कडक कारवाई सुरू झाली असून त्या अंतर्गत चीन सरकारनेच त्यांना ताब्यात घेतले असावे. ते फ्रांसवरून चीनला येताच तपास अधिकाऱ्यांच्या एक पथकाने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याचेही एका वृत्तात नमूद करण्यात आले आहे. पण चीन मधील राजवटीच्या कार्यशैलीनुसार त्यांच्या अटकेच्या वृत्ताची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. इंटरपोलचे अध्यक्षपद भूषवणारे ते चीनचे पहिले प्रतिनिधी आहेत. चीनच्या अधिकाऱ्यांनीही या विषयी मौनच बाळगणे पसंत केले आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)