इंटरपोलकडून मेहुल चोक्‍सीविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी

नवी दिल्ली: पीएनबी घोटाळ्यातील आरोपी असणारा हिरे व्यापारी मेहुल चोक्‍सी याच्याविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली. त्यामुळे तो भारताच्या ताब्यात येण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा मामा चोक्‍सी यांनी पंजाब नॅशनल बॅंकेला (पीएनबी) तब्बल 13 हजार कोटी रूपयांचा गंडा घातला. त्या प्रकरणाकडे पीएनबी घोटाळा म्हणून पाहिले जात आहे. ते प्रकरण देशातील सर्वांत मोठा बॅंक घोटाळा ठरला आहे. घोटाळा करून नीरव आणि चोक्‍सी हे दोघेही देशाबाहेर फरार झाले. अँटिग्वाचे नागरिकत्व स्वीकारलेल्या चोक्‍सी आणि त्याच्या कंपन्यांनी पीएनबीची 7 हजार कोटी रूपयांची फसवणूक केली.

सीबीआयने याआधीच नीरव आणि चोक्‍सीविरोधात स्वतंत्र आरोपपत्रे दाखल केली आहेत. आता सीबीआयच्या विनंतीवरूनच इंटरपोलने चोक्‍सीविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली. इंटरपोल ही आंतरराष्ट्रीय पोलीस सहकार्य यंत्रणा आहे. त्या यंत्रणेने बजावलेल्या नोटिसीकडे आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट म्हणून पाहिले जाते. त्याद्वारे इंटरपोल सदस्य देशांना संबंधित आरोपीला अटक करण्याची किंवा ताब्यात घेण्याची सूचना करते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)