इंटरनेट वापरात मराठीचा झेंडा ; हिंदी भाषेला टाकले मागे

नवी दिल्ली : भारतात सर्वाधिक प्रमाणात बोलली आणि लिहिली जाणारी भाषा हिंदी आहे. मात्र, इंटरनेट वापरात सर्वाधिक मराठी, बंगाली आणि तेलुगू भाषकांचा दबदबा असल्याचे एका सर्व्हेक्षणातून समोर आले आहे. रेवरी लँग्वेज टेक्नॉलॉजीने याबाबतचे सर्व्हेक्षण केले होते. त्यामध्ये मराठी युजर्स इंटरनेटवर सर्वाधिक अॅक्टीव्ह असल्याचे सांगण्यात आले आहे.

‘द डीजिटल भारतीय भाषा’ अहवालानुसार (द्वितीय आवृत्ती) अंड्रॉईड युजर्सकडून वापरण्यात येणाऱ्या भाषेसंदर्भात अॅनॅलिसीस करण्यात आले. त्यामध्ये रेव्हरीज आणि इंडिक की-बोर्ड स्वलेख फ्लीप हे अॅप डाऊनलोड केलेल्या 89,000 युजर्संचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये प्रत्येक युजर्सकडून प्रमाण भाषेत सरासरी किती शब्द टाईप केले जातात हे तपासण्यात आले. त्यानुसार मराठी आणि बंगाली नागरिकांकडून डीजिटल प्लॅटफॉर्मचा सर्वाधिक वापर होत असल्याचे दिसून आले आहे. तसेच या युजर्संकडून अधिक प्रमाणात प्रादेशिक भाषेचा वापर करण्यात येतो.

इंटरनेटवरील माहितीचाही सर्वाधिक उपयोग या युजर्संकडूनच केला जात आहे. याशिवाय प्रमुख भारतीय भाषांसोबतच, बोडो, डोगरी, मैथिली, सिंधी आणि संताली भाषेचाही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. दरम्यान, 99 टक्के भारतीय युजर्सं आपल्या मोबाईलमध्ये इंटरनेट कनेक्शन वापरतात. तर जवळपास 54 टक्के युजर्स 5 ते 11 हजार रुपयांच्या किमतीचे सर्वसाधारण मोबाईल वापारतात.

गुगलने नुकतेच प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार 500 मिलियन्स भारतीय युजर्स जुन 2018 मध्ये ऑनलाईन युजर्स असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये 73 टक्के युजर्स त्यांच्या स्थानिक भाषेतून ऑनलाईन डेटा सर्च करतात. दरम्यान, 2020 पर्यंत भारतीय भाषेतील इंटरनेट युजर्सची संख्या 530 मिलियन्स होईल, असा अंदाज आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)