इंटरनेट माहिती देईल संस्कार नाही : चांदोरकर ः बा. ह. नाईकवाडी 

अकोले – एकविसाव्या शतकामध्ये माहिती तंत्रज्ञानामुळेजगभरातील माहिती गुगल आपणास देऊ शकेल परंतु मानवी संस्कार मात्र गुगल देऊ शकत नाही, असे प्रतिपादन लेखिका स्वाती चांदोरकर यांनी केले.
स्वातंत्र्य सेनानी बा. ह. नाईकवाडी यांच्या 8 व्या स्मृतिदिनानिमित्त त्या प्रमुख व्याख्यात्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी अगस्ती एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या सेक्रेटरी दुर्गाबाई नाईकवाडी होत्या. संस्थेचे कार्यवाहक शिरीष नाईकवाडी, सतीश नाईकवाडी, संदीप नाईकवाडी, देविका देशपांडे, शैलजा पोखरकर, भानुदास पोखरकर, संपत नाईकवाडी, चेतन नाईकवाडी, सुधाकर आरोटे, लक्ष्मण आव्हाड, बबन नवले यांच्यासह सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
चांदोरकर म्हणाल्या, आयुष्यात विचार व कृती यामध्ये तफावत ठेवूनका. कोणतेही कार्य कठीण नसते त्यासाठी जिद्द, आत्मविश्‍वास आवश्‍यक असतो. तोच तुम्हाला तुमच्या ध्येयाकडेघेऊन जाईल. नाईकवाडी बाबांचेकार्य त्यासाठी आपल्या सर्वांना प्रेरणा देणारे आहे. विद्यार्थ्यांनी मोबाइल, टीव्हीवरचे कार्यक्रम जरूर पहावेत परंतु काय पहावे त्यासाठीचे मार्गदर्शन आई – वडील , शिक्षकांनी करावे. यामुळे हल्ली भेडसावणाऱ्या मोबाइल आणि टी.व्ही. या पालकांना वाटणाऱ्या समस्यांचे निराकरण होऊ शकते. परमेश्‍वर तर श्रेष्ठ आहेच परंतुगुरुचेही स्थान मानवी जीवनामध्ये महत्त्वाचेआहेम्हणून आई-वडील , गुरु यांचा मान-सन्मान ठेवा. तोआपल्यासाठी एक अमूल्य ठेवा आहे, असेही चांदोरकर म्हणाल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)