“इंटरनेट ऑफ थिंग्ज’वर रायसोनी’मध्ये प्रशिक्षण

वाघोली- येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनियरींग ऍण्ड मॅनेजमेंट महाविद्यालयातील माहिती तंत्रज्ञान विभाग आणि इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्‍ट्रिकल ऍन्ड इलेक्‍ट्रॉनिक्‍स इंजिनीअरिंग (आयईईई) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने इंटरनेट ऑफ थिंग्ज’ या विषयावर प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. याप्रसंगी रायसोनी शिक्षण संस्थेचे विश्वस्त संचालक अजित टाटिया, मायस्किल इन्हेन्सरचे व्यवस्थापक नीरज बन्नोरे, प्राचार्य डॉ. आर. डी. खराडकर, प्रभारी संचालक डॉ. वैभव हेंद्रे उपस्थित होते. विविध ऍप्लिकेशन्स, त्याचे महत्त्व आणि त्याचा इंटरनेट ऑफ थिंग्जशी असलेला संबंध यावर डॉ. वैभव हेंद्रे यांनी विचार मांडले. थेअरी आणि प्रात्यक्षिक अशा दोन स्वरूपात हे प्रशिक्षण झाले. हरीश झंबारे यांनी प्रशिक्षण दिले. प्रा. प्रिया उजावे आणि प्रा. अपशाबी पठाण यांच्यासह माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सर्व शिक्षकांनी आठवड्याचे प्रशिक्षण यशस्वी करण्यात मेहनत घेतली. प्रा. सिमरन खियानी यांनी प्रास्ताविक केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)