इंटरनेटसाठी “रिलायन्स’ला मुदतवाढ

पिंपरी – महापालिकेच्या विविध कार्यालयांना इंटरनेट सुविधा पुरविण्यासाठी रिलायन्स कम्युनिकेशन्स या ठेकेदार कंपनीला तीन महिने मुदतवाढ देण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 29 लाखांचा खर्च होणार आहे. स्थायी समितीच्या साप्ताहिक सभेत या प्रस्तावास मान्यता देण्यात आली.

महापालिकेच्या विविध कार्यालयांना इंटरनेट सेवा उपलब्ध करण्याकरिता माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत सन 2015 मध्ये निविदा मागविण्यात आल्या होत्या. या कामकाजासाठी रिलायन्स कम्युनिकेशन्स यांचा सर्वात कमी म्हणजेच 1 कोटी 15 लाख रूपये इतका दर प्राप्त झाला. ही इंटरनेट बॅण्डविडथ सुविधा उपलब्ध करण्याकरिता येणाऱ्या खर्चास स्थायी समिती सभेत 19 मे 2015 रोजी मान्यता देण्यात आली. त्यानुसार, रिलायन्स कम्युनिकेशन्स यांच्यासमवेत करारनामा करण्यात आला. “स्मार्ट सिटी’ आणि “सिटी इन्फ्रास्ट्रक्‍चर बॅकबोन’ या प्रकल्पाअंतर्गत महापालिकेच्या संपूर्ण कार्यालयांना कनेक्‍टीव्हीटी आणि वाय-फाय सुविधा पुरविण्यात येणार होती. मात्र, या प्रकल्पाचे कामकाज सध्या कार्यान्वित आहे. रिलायन्स कम्युनिकेशन्स यांच्या कामकाजाची मुदत 30 जून 2018 रोजी संपुष्टात येत आहे.

-Ads-

महापालिकेच्या विविध कार्यालयांना इंटरनेट कनेक्‍टीव्हीटी उपलब्ध करण्याकरिता माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या वतीने नव्याने निविदा प्रक्रीया राबविण्यात येत आहे. मात्र, निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन निविदाधारकास कामकाज आदेश दिल्यानंतर नव्याने नियुक्त केलेल्या संस्थेमार्फत महापालिकेच्या विविध कार्यालयांना इंटरनेट सुविधा उपलब्ध करण्याकरिता साधारणत: एक ते दोन महिन्याचा कालावधी लागण्याची शक्‍यता आहे. महापालिकेचे बहुतांश कामकाज ऑनलाईन पद्धतीने होते. इंटरनेट सुविधा कार्यालयांना उपलब्ध न झाल्यास कार्यालयीन कामकाजात अडथळा येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे रिलायन्स कम्युनिकेशन्स यांना तीन महिने कालावधीकरिता मुदतवाढ देणे आवश्‍यक आहे. रिलायन्स कम्युनिकेशन्स यांचा निविदेतील वार्षिक दर 1 कोटी 15 लाख रूपये आहे. त्यानुसार, 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2018 या तीने महिने कालावधीकरिता 28 लाख 74 हजार रूपये खर्च अपेक्षित आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)