इंटरनॅशनल मॅग्झीनच्या एडिटरवर भडकली प्रियांका

प्रियांका चोप्रा बॉलीवूडबरोबर हॉलीवूडमध्येही आता सेलिब्रिटी बनली आहे. तिच्याशी संबंधित घडामोडी या सिनेमॅग्झीनसाठी खुराक बनत असतात. तिच्या पॉप्युलर शो “क्‍वांटिगो’च्या प्रमोशनसाठी ती सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे. तिथे एका मॅग्झीनच्या ऑफिसमध्ये ती पोहोचली आणि तिने चक्‍क तिथल्या एडिटर बॉसवरच रेशन घ्यायला सुरुवात केली. इतके की या एडिटर महिलेला तिच्याच ऑफिसमध्ये बसलेली प्रियांका चक्‍क ‘गेट आऊट’ म्हणाली.

हा किस्सा अन्य दुसऱ्या कोणी नाही, तर स्वतः प्रियांकानेच सांगितलेला आहे. खरे तर हा एक “फनी व्हिडीओ’ होता. प्रियांकाने हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. “क्‍वांटिगो’च्या प्रमोशनसाठी या मॅग्झीनच्या ऑफिसमध्ये जेवढा वेळ ती असणार होती, तेवढा वेळ तिला या ऑफिसच्या बॉसचा रोल करायचा होता. यावेळात तिला अतिशय कडक स्वभावाच्या बॉससारखे वागायचे होते. पण प्रियांका जरा जास्तच कडक बॉससारखी वागली. ती या मॅग्झीनमधील चुका काढायला लागली आणि या एडिटरचा चांगलाच क्‍लास घ्यायला लागली.

मॅग्झीनमधील चुकांबाबत या एडिटरची चांगलीच खरडपट्टीही प्रियांकाने काढली. एवढेच नव्हे तर या एडिटरला चक्‍क बाहेर घालवून द्यायलाही प्रियांकाने मागे पुढे बघितले नाही. तिचा हा रुद्रावतार बघून बिचारी एडिटर अगदी कावरी बावरी झालेली या व्हिडीओमध्ये दिसते आहे. काही मिनिटांच्या या फनी व्हिडीओच्या शूटिंगनंतर मात्र या ऑफिसमध्ये हास्यकल्लोळ उठला असेल, हे निश्‍चित आहे.

प्रियांका अशाप्रकारे कोणाशीही वागणार नाही, याची सगळ्यांनाच खात्री आहे. मात्र हा फनी व्हिडीओ बघून आश्‍चर्यही वाटते. गेल्या काही महिन्यांपासून हॉलीवूडमध्ये सक्रिय असल्याने अलिकडे तिचे बॉलीवूडमधील सिनेमे खूपच कमी झाले आहेत. लवकरच ती सलमान खानच्या बरोबर “भारत’मधून पुनरागमन करणार आहे. प्रियांका आणि सलमान सर्वात पहिल्यांदा 2004 मध्ये “मुझसे शादी करोगी’मध्ये एकत्र दिसले होते. यानंतर “सलाम ए इश्‍क’ आणि “गॉड तुस्सी ग्रेट हो’मध्येही हे दोघे स्टार एकत्र होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)