“इंजिनिअरिंग मेकॅनिक्‍स’चा पेपर फुटला?

पेपर “व्हायरल’ : विद्यापीठ प्रशासन म्हणते, “विद्यार्थ्यांचा खोडसाळपणा’

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकीच्या (इंजिनिअरिंग) पहिल्या वर्षाचा बुधवारी झालेला “इंजिनिअरिंग मेकॅनिक्‍स’ हा पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे. पेपर सुरू असतानाच, कोणाकडून तरी हा पेपर “व्हायरल’ झाल्याचे दिसून आले. दरम्यान, पुणे विद्यापीठाने हो पेपर फुटला नसल्याचा दावा केला आहे. एवढेच नव्हे, तर काही विद्यार्थ्यांचा हा खोडसाळपणा असल्याचे विद्यापीठाचे म्हणणे आहे.

अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाचा बुधवारी असलेला “इंजिनिअरिंग मेकॅनिक्‍स’ हा पेपर फुटल्याची तक्रार विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे आली. पौड रस्त्यावरील एमआयटी कॉलेजमध्ये घडल्याचे तक्रारदारांचे म्हणणे होते. याबाबत माहिती घेण्यासाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने आपले पथक एमआयटी महाविद्यालयात पाठवले. या पथकाने केलेल्या चौकशीत असे आढळले की, हा पेपर फुटलेला नाही. परीक्षेची वेळ दहा ते बारा अशी होती. मात्र दहा वाजता परीक्षा सुरू झाल्यानंतर कोणीतरी मोबाईलवर प्रश्नपत्रिकेचे फोटो काढून ते बाहेर पाठवून दिले. त्यानंतर हे पेपर व्हायरल झाले, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

या संदर्भात खोडसाळपणा करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे विद्यापीठाने निश्‍चित केले आहे. त्यासाठी आवश्‍यकता भासल्यास पोलिसांमध्ये तक्रार देण्यात असून, खोडसाळपणा करणाऱ्यांना शोधण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात येणार आहे. तसेच, याबाबत महाविद्यालयाकडून हलगर्जीपणा झाल्याचे सिद्ध होताच, त्यांच्यावरही कडक कारवाई करण्याचा इशारा विद्यापीठाने दिला आहे.

दोन प्रश्‍नपत्रिका जुन्याच
काही क्‍लासचालकांनी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला पेपर फुटल्याच्या नावाखाली तीन प्रश्नपत्रिका पाठवल्या होत्या. त्यापैकी दोन प्रश्नपत्रिका 2014 व 2017 या वर्षातील म्हणजे जुन्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. तिसरी प्रश्नपत्रिका बुधवारी झालेल्या पेपरची होती. त्याच्यावर वॉटरमार्क आहेत. त्यावरून हा पेपर कॉलेजने परीक्षेपूर्वी केवळ अर्धा तास आधी डाऊनलोड केल्याचे स्पष्ट होते. त्यानंतर हे पेपर विद्यार्थ्यांना वर्गात पेपर लिहिण्यासाठी दिले जातात. त्यामुळे हा पेपर परीक्षेला दिल्यानंतर मगच कोणीतरी खोडसाळपणा करून तो बाहेर पाठवला, असे विद्यापीठाच्या पथकाने केलेल्या तपासणीत स्पष्ट झाले आहे.

विद्यापीठाचे म्हणणे हास्यास्पद
अभियांत्रिकी शाखेच्या पहिल्या वर्षाचा पेपर परीक्षा सुरू होत असतानाच मोबाईलवरून व्हायरल होतो. त्यानंतर पेपर फुटल्याचे स्पष्ट होत आहे. याउलट पेपर सुरू असताना प्रश्‍नपत्रिका बाहेर येणे हा काही विद्यार्थ्यांचा खोडसाळपणा, असे विद्यापीठाचे म्हणणे हास्यास्पद आहे. विद्यापीठाने याप्रकरणी सखोल चौकशी करावी, अशी मागणी सिनेट सदस्य संतोष ढोरे यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)