इंग्लिश काऊंटी क्रिकेटसाठीे विराट कोहली सज्ज

अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीला मुकणार

नवी दिल्ली – मायदेशातील निर्जीव खेळपट्ट्यांवर खोऱ्याने धावा करणारे भारतीय खेळाडू इंग्लंडमधील चेंडूला उसळी देणाऱ्या खेळपट्ट्यांवर फलंदाजी करताना अपयशी ठरतात. हा शिक्‍का पुसण्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली इंग्लंडमधील सरे या क्‍लबकडून काऊंटी क्रिकेट खेळताना दिसणार आहे. यामुळे   कोहली अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्याला मुकणार आहे. येत्या 14 ते 18 जून दरम्यान ही कसोटी होणार आहे.

कोहलीची इंग्लंडमधील कामगिरी त्याच्या लौकिकाला साजेशी नाही. प्रत्येक देशात धावांची बरसात करणाऱ्या कोहलीची बॅट इंग्लंडमध्ये मात्र आपली कमाल दाखवू शकलेली नाही. इंग्लंडमध्ये कोहलीला 10 डावांत केवळ 13.40 च्या सरासरीने जेमतेम 134 धावा करता आल्या आहेत. यादरम्यान 39 ही त्याची सर्वाधिक धावसंख्या आहे. विराटची कसोटीतील फलंदाजीची सरासरी 50 च्या पुढे असताना इंग्लंडमधील सरासरी केवळ 13.40 आहे.

या आपल्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी विराट कोहलीने इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएल संपल्यानंतर कोहली लगेचच इंग्लंड दौऱ्याआधी काऊंटी क्रिकेटसाठी रवाना होणार आहे. येत्या ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जात आहे. भारतीय संघ इंग्लंडमध्ये पाच कसोटी, तीन वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. दौऱ्याआधी इंग्लंडमधील खेळपट्ट्या, हवामान आणि वातावरणाचा अंदाज घेण्यासाठी कोहलीने हा निर्णय घेतला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)