इंग्लंडमध्ये फेसबुकला 5 लाख पौंड दंड

लंडन – ग्राहकांच्या माहितीचे संरक्षण न झाल्याबद्दल इंग्लंडमध्ये फेसबुकला तब्बल 5 लाख पौंडांचा दंड करण्यात आला आहे. केंब्रिज अॅनालिटीकाच्या डाटा लीक प्रकरणी इंग्लंडच्या माहिती आयुक्तालयाच्या वतीने फेसबुकला हा दंड ठोठावला आहे.

फेसबुकशी संबंधित या प्रकरणामुळे या वर्षाच्या सुरुवातीला सोशल मिडीयातील अग्रणी असलेल्या फेसबुकची मोठी नाचक्की झाली होती. 2007 ते 2014 दरम्यान फेसबुकच्या ग्राहकांच्या वैयक्तिक माहितीचा वापर अॅप्लिकेशन डेव्हलप करणाऱ्या अन्य संस्थेकडून केला गेला होता. त्या माहितीच्या वापरासाठी कोणतीही पूर्वपरवानगी घेतली गेली नव्हती. ग्राहकांनी अॅप डाऊनलोड केले नव्हते. पण फेसबुक वापरणाऱ्यांचे मित्र असले तरीही त्यांच्या माहितीचा वापर केला गेला होता. ग्राहकांच्या डाटाच्या बेकायदेशीर वापराबाबत फेसबुकसारख्या मोठ्या कंपनीने अधिक चांगली काळजी घ्यायला हवी होती, असे माहिती आयुक्तांनी म्हटले आहे. “डाटा लीक’ प्रकरण 2015 मध्ये उघड झाले. त्यानंतरही फेसबुकने प्रभावी उपाय योजना केल्या नाहीत, असेही या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“डाटा लीक’ कायद्यांतर्गत 17 लाख पौंड किंवा वार्षिक उलाढालीच्या 4 टक्के इतका दंड आकारण्याची तरतूद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)