इंग्लंडमधील अपघातात मरण पावलेल्या 8 जणात 3 विप्रो कर्मचारी

लंडन (इंग्लंड)-दक्षिण इंग्लंडमध्ये झालेल्या एका भीषण अपघातात मरण पावले असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. 8 मृतांमध्ये 3 विप्रो कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती विप्रोच्या प्रवक्‍त्याने दिली आहे. कार्तिकेयन रामसुब्रमन्यम पुगालुर, ऋषी राजीव कुमार आणि विवेक भासकरन हे इंग्लंडमध्ये झालेल्या अपघातात मरण पावल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

दक्षिण इंग्लंडमधील एका महामार्गावर हा विचित्र अपघात झाला. एके मिनि बस दोन ट्रक्‍सम्नध्ये सापडली आणि त्यातील 11 पैकी 8 जण ठार झाले. 5 वर्षांच्या एका मुलीह 3 जण हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत. रायझर्डस मेसिरेक (31). वॅगस्टाफ (51) या दोन्ही ट्रक ड्रायव्हर्सवर आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे.
फ्रान्सला जाण्यासाठी हे सर्व मिनी बसने लंडनला निघाले होते. तेथून त्यांना पुढची गाडी पकडायची होती, पण त्यापूर्वीच त्यांना मृत्यूने पकडले. मिनी बसचा ड्रायव्हरही अपघातात मरण पावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)