भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा  कर्णधार जो रुटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हा शेवटचा अंतिम कसोटी सामना जिंकून मालिका ४-१ अश्या मोठ्या फरकाने जिंकण्याचा इंग्लंडचा निर्धार असेल तर भारतीय संघ हा सामना जिंकून मोठी नामुष्की टाळण्यासाठी मैदानात उतरेल.

चौथ्या कसोटी सामन्यानंतर  झालेल्या पत्रकार परिषदेनंतर विराटने इंग्लंडचा संघ भारतापेक्षा सरस कामगिरी करत असल्याचे मान्य केले होते. खेळाच्या सर्व आघाड्यांवर इंग्लंडचा संघ भारतीय संघाला वरचढ ठरत आहे. मोक्याच्यावेळी सामना जिंकण्याच्या संधी दडवल्याने भारताला पहिला आणि चौथा कसोटी सामना गमवावा लागला होता. त्यामुळे मालिका गमाविण्याचंगी नामुष्की भारतीयांवर ओढवली आहे.

इंग्लंडच्या संघानी अगोदरच मालिका जिंकली असली तरी देखील संघात मोठे बदल केले नाहीत. तर भारतीय संघात हार्दीक पांड्या ऐवजी हनुमान विहारी याला संधी मिळाली आहे.  हनुमान विहारी आजच्या सामन्यातून भारतीय संघात पदार्पण करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)