इंग्रजी येणाऱ्या लोकांना जगात मागणी

मंचर-जगात इंग्रजी भाषा महत्वाची आहे. इंग्रजी भाषा बोलणे आणि त्याचा सराव करणे. विद्यार्थ्यांच्या करियरच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. इंग्रजीवर ज्याचे प्रभुत्व आहे. त्याला जगात कोठेही नोकरी किंवा व्यवसाय करण्यासाठी अडचण येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेचा जास्तीत जास्त अवलंब करावा, असे आवाहन अमेरिकन शिक्षिका लॉरेन लिनीर यांनी केले.
कळंब (ता. आंबेगाव) येथील कमलजादेवी विद्यालयाला इंटरनॅशनल रिसर्च आणि एक्‍सचेंजकडून अमेरिकन शिक्षिकांनी टीजीसी टीचर फॉर ग्लोबल क्‍लासरूम प्रोग्राम अंतर्गत अमेरिकन शिक्षिका लॉरेन लिनीर, नॉर्थ कॅरोलिना येथील बावी ऍलोनड्रिआ लुईसियाना, सिमबॉयसिस कॉलेज पुणे येथील प्रा. स्मिता वर्पे यांनी शाळेला भेट दिली.
कार्यक्रमासाठी आंबेगाव पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे, विद्यालयाचे प्राचार्य नानासाहेब नेहे, मुख्याध्यापक विठ्ठल गभाले, पर्यवेक्षक ज्ञानेश्‍वर गंलांडे, बापू वर्पे, अंकुश दाते, मच्छिंद्र वायाळ, अभिजित भालेराव, शिक्षकवृंद, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. अमेरिकन शिक्षिका लॉरेन लिनीर, ऍलोनड्रिआ लुईसियाना यांनी इंग्रजी भाषेतून इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
तसेच कमलजादेवी प्रि प्रायमरी इंग्लिश स्कूलमधील, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंब येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या दोन्ही अमेरिकन शिक्षिकांची इंग्रजी भाषेची मराठी भाषांतराची भूमिका प्रा. स्मिता वर्पे यांनी पार पाडली. या कार्यक्रमाचा मूळ उद्देश मुले आणि शिक्षक यांच्यामधील शिकवताना येणाऱ्या अडीअडचणी संदर्भात ही भेट विशिष्ट शाळांमध्ये आयोजित केली होती.
यावेळी लॉरेन लिनीर, सभापती उषा कानडे, प्रा. स्मिता वर्पे यांची भाषणे झाली. या कार्यक्रमासाठी अभिजित भालेराव यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन बाळासाहेब आरेकर यांनी केले. तर प्रदर्शन महेंद्र तोडकर यांनी आभार मानले.

मनातील न्यूनगंड काढून टाका – कानडे
सभापती कानडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, इंग्रजी भाषेविषयी भीती न बाळगता बिनधास्तपणे इंग्रजी भाषा बोलावे. सरावाने माणसाची प्रगती होवून तुमच्यातून पुढे निष्णांत वक्‍ता घडू शकतो. विद्यार्थ्यांनी आपल्यातील इंग्रजी विषयाचा न्यूनगंड काढून टाकून इंग्रजी भाषेवर प्रभुत्व निर्माण करावे. असे विद्यार्थ्यांना आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)