इंग्रजी माध्यमांच्या शाळांची ओसरतेय गर्दी

जिल्हा परिषद शाळांकडे वाढला ओघ
राहुरी फॅक्‍टरी – जिल्हा परिषद मराठी माध्यमाच्या शाळेच्या वाढत्या गुणवत्तेच्या जोरावर आता इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गर्द काहीसी ओसरत असल्याचे चित्र परीसरात दिसुन येते आहे.
बरेच पालकवर्गाने आपले पाल्य इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून काढुन मराठी माध्यमाच्या शाळेत नव्याने प्रवेश घेतल्याचे स्पष्ट पणे दिसत आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील व्यवस्थापनाने चांगलाच धसका घेतला आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत फक्त क्‍टीवीटी या गोंडस नावाखाली विद्यार्थी यांच्याकडून पैसे मागितले जातात. विद्यार्थी यांना शिक्षण हे मुख्यत्वे करून दिलेच जात नाही असा स्पष्ट आरोप काही पालक करत आहे. राहुरी तालुक्‍यातील जवळपास ब-याचशा इंग्रजी शाळेत तर फक्त स्पर्धा सुरू झाली आहे. आमच्या शाळेत इतर शाळेपेक्षा बराच अभ्यास करून घेतला जातो असा फतवा काढला आहे.
एका शाळेत तर फक्त याच दुकान दाराकङुन शाळेचा ङ्‍रेस विकत घ्यायचा असे धमकी वजा फर्मान विद्यार्थी यांना सोडले आहे.मुले कशी अभ्यास करतात यावर शाळा व्यवस्थापन भाष्य करण्यास टाळत आहे. मराठी माध्यमाच्या शाळेतील पटसंख्या कमी झाल्यास शिक्षक कमी होईल यां भिती पोटी आता जिल्हा. परिषद शाळेतील शिक्षक मनापासून शिक्षण देण्यासाठी धडपडत असतात. बदलत्या काळानुसार मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, हा उदात्त हेतू मनात ठेवून अनेक पालकांनी आपली मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल केली.मात्र इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शुल्क न पेलवत नसल्याने तसेच अवास्तव शुल्क वसुल केले जात असल्याचे पालकांना लक्षात आल्याने शाळांबद्दलचा मतप्रवाह बदलला आहे.त्यामुळे अनेकांनी आपले मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून काढुन मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश केला आहे.
सध्या इंग्रजी शाळेत दाखला करताना त्या मुलाची प्रवेश परीक्षा घेतल्याचे सुध्दा काही शाळेत दिसुन आले आहे. परंतु ङोक्‍याला मनस्ताप नको म्हणुन कोणताच पालक पुढे येउन तक्रार करण्यासाठी धजावत नाही. शाळेची फी सुध्दा अव्वाच्या सव्वा असल्याने पालक मेटाकुटीला आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)