इंग्रजीच्या विभागातील विद्यार्थ्यांचे उपोषण मागे

कुलगुरूंशी चर्चेनंतर मागण्या मान्य : डॉ. संजीव सोनवणे नवे विभागप्रमुख
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाच्या विद्यार्थ्यांची शनिवारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर उपोषण मागे घेण्यात आले. विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांची मागणी मान्य करून विद्यमान विभागप्रमुखांना जबाबदारीतून मुक्त केले आहे. तसेच, त्यांच्याजागी शिक्षणशास्त्र व विस्तार विभागाचे प्रमुख डॉ. संजीव सोनवणे यांची प्रभारी विभागप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

विविध मागण्यांसाठी इंग्रजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी गेली तीन दिवसांपासून उपोषण सुरू केले होते. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला. इंग्रजीच्या सत्र परीक्षांवरही आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी बहिष्कार टाकला. दोन दिवसांच्या चर्चेत सकारात्मक निर्णय न झाल्याने विद्यार्थ्यांचे आंदोलन चिघळले. यानंतर कुलगुरूंनी शनिवारी पुन्हा विद्यार्थ्यांशी चर्चा केली. यावेळी झालेल्या चर्चेत त्यांच्या अडचणी व मागण्या मान्य करण्यात आल्या.

विद्यमान विभागप्रमुखांना हटवून डॉ. संजीव सोनवणे यांच्याकडे प्रभारी कार्यभार सोपवण्यात आला आहे. दरम्यान, इंग्रजीच्या सत्र परीक्षा सुरू झाल्या असून आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला आहे. जे विद्यार्थी सध्या नियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा देत आहेत. त्यांच्या परीक्षा सुरळीतपणे होतील, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)