इंगळून घाटात भाविकांचा टेम्पो उलटला

जुन्नर – अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्‍यातील भाविकांचा पिकअप टेम्पो जुन्नर तालुक्‍यातील हिवरे पठारावरील वरसुबाई देवीच्या दर्शनासाठी जात असताना इंगळून घाटात उलटला. हा अपघात आज (दि. 30) दुपारी 3:00 ते 4:00च्या सुमारास घडला. या अपघातात प्रवीण रावसाहेब मिंढे (वय 35, रा. महालवाडी, ता. संगमनेर) हा युवक जागीच मृत्यमुखी पडला तर अन्य प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. किरकोळ जखमींना उपचारासाठी जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात तर अन्य गंभीर प्रवाशांना पिंपरी-चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

संगमनेर तालुक्‍यातील महालवाडी येथील भाविक जुन्नरच्या दुर्गम आदिवासी भागातील हिवरे पठार येथील वरसुबाई देवीच्या दर्शनसाठी जात असताना इंगळून येथील घाटात त्यांचा पिकअप टेंम्पो (क्र. एमएच 17 टी 8924) वळण घेत असताना उलटला. या वाहनातील प्रवीण मिंढे हा जागीच मृत झाला तर शांताराम शंकर मिंढे, अनिता विकास मिंढे, नंदा शरद मिंढे, बाळासाहेब नामदेव मिंढे, रोहित विकास मिंढे, उर्मिला बाळासाहेब मिंढे, संजय नामदेव मिंढे, कुसुम सावळेराम मिंढे, विठ्ठल हरी मिंढे, विकास बाबू मिंढे, ओमकार संजय मिंढे, भीमाबाई सीताराम मिंढे, दिक्षा विकास मिंढे, ऋतुजा संजय मिंढे हे सर्वजण या अपघातात जखमी झाले. जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांनी जखमींची जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात भेट घेऊन घटनास्थळी भेट दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)