आ. शिवेंद्र सिंहराजेंचा आरटीओवर धडक मोर्चा

रिक्षा स्क्रॅप करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी : कारवाई न करण्याचे अधिकाऱ्यांचे आश्‍वासन

सातारा – सोळा वर्ष पुर्ण झालेल्या रिक्षा स्क्रॅप करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर त्या निर्णयाविरोधात आ.शिवेंद्रसिंहराजे आक्रमक झाले आहेत. शुक्रवारी रिक्षा व्यवसायिकांसमवेत त्यांनी आरटीओ कार्यालयावर थेट रिक्षातून प्रवास करत धडक दिली. तसेच रिक्षाव्यवसायिकांनी 20 वर्षापर्यंतचा पर्यावरण कर भरला असून तो पर्यंत कोणतीही कारवाई करण्यात येवू नये,अशी मागणी त्यांनी केली. त्यावर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी तुर्त कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही, असे असे आश्‍वासन दिले. दरम्यान, यावेळी रिक्षा व्यवसायिकांच्या उपस्थितीत आ.शिवेंद्रसिंहराजे व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांच्यात चर्चा झाली. त्यावेळी, वाहनांच्या माध्यमातून प्रदूषण होवू नये ही आमची देखील भूमिका आहे. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वाहन तपासणी काटेकोरपणे होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आरटीओ अधिकारी स्वत: वाहन तपासून फिटनेस सर्टिफिकेट देत आहेत. त्यामुळे जूनी व नवीन वाहने यात फरक राहिलेला नाही. केंद्र व राज्य शासन वाहन कायद्यात बदल करून वेळावेळी नवीन नियम तयार करित आहे. या नियमानुसार टॅक्‍सी व रिक्षा मालक आपल्या वाहनाबाबत योग्य तपासणी करून घेवून नियमांचे पालन करित आले आहेत. अशा प्रकारे वाहन सुस्थितीत ठेवलेले असताना शासन वर्षांची अट घालून वाहन मोडीत काढण्याचे काम करित आहे. अशावेळी सर्वांनाच नवीन वाहन घेणे व त्यासाठी कर्ज मिळणे शक्‍य होत नाही.

परिणामी त्यांना उपजिविका करणे जिकरीचे झाले आहे, अशी खंत आ.शिवेंद्रसिंहराजे यांनी मांडली. त्यावर धायगुडे यांनी धोरणात्मक निर्णय असून तुर्त आम्ही कोणत्याही रिक्षांवर कारवाई केलेली नाही. मात्र, आपण वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केल्यास प्रश्‍न सुटु शकेल असे सांगितले. त्यावर आ.शिवेंद्रसिंहराजे यांनी तसा पाठपुरावा करू असे यावेळी सांगितले. यावेळी नगरसेवक बाळासाहेब खंदारे, फिरोज पठाण, हर्षल चिकणे, बाजार समितीचे सभापती विक्रम पवार यांच्यासह रिक्षाव्यवसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकच राजे म्हणताच…

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांच्या दालनात चर्चा चालू असताना आ.शिवेंद्रसिंहराजेंनी शाब्दिक टोले बाजी केली. ते म्हणाले, शिवेंद्रसिंहराजेंचा आणि रिक्षाचा काय संबध, असा प्रश्‍न काही जण विचारतील. त्यांना उत्तर म्हणून आता मी देखील परमिट आणि रिक्षा घेणारंय आणि सुरूची बंगला परिसरात लावणार आहे. असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. तर आरटीओ कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर आ.शिवेंद्रसिंहराजेंनी बाहेर थांबलेल्या रिक्षा व्यवसायिकांना आश्‍वासित करताना चर्चेचा तपशील सांगितला. त्यावर आनंदीत झालेल्या एका रिक्षा चालकाने, एकच राजे…अशी घोषणा दिली. मात्र, तेवढ्यात तशा घोषणा न देण्याच्या सूचना आ.शिवेंद्रसिंहराजेंनी केल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)