आ. शिवाजी कर्डिलेंच्या दोन मुली रिंगणात ; खा. दिलीप गांधी व आ.अरुण जगताप यांच्या सूनबाई जोरात 

नगर: महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज दाखल झाले. या निवडणुकीत भाजपचे आ. शिवाजीराव कर्डिले यांनी आपल्या दोन मुली निवडणूक रिंगणात उभे करण्याची परंपरा यावेळी कायम ठेवली आहे. तर भाजपचे खासदार दिलीप गांधी यांच्या सुपुत्रासह सुनबाई देखील निवडणूक मैदानात आल्या असून राष्ट्रवादीचे आमदार अरूण जगताप यांच्या सुनबाई व राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या पत्नी रिंगणात उतरल्या आहेत.

आ. कर्डिले यांनी दोन मुली निवडणुक रिंगणात उतरविण्याची परंपरा यावेळी कायम राहिली आहे. याची पहिली मुलगी व भानुदास कोतकर याची सुन सुवर्णा कोतकर यावेळी रिंगणातून बाहेर पडल्या असल्या तरी आ. कर्डिले यांनी आपली तिसरी मुली ज्योती अमोल गाडे प्रभाग क्रमांक 4 अ मधून राष्ट्रवादीच्या चिन्हावर उभी केली आहे. तर दुसरी मुली शितल जगताप ही प्रभाग क्रमांक 14 अ म्हणून रिंगणात उतरली आहे. शितल जगताप या आमदार अरुण जगताप यांच्या सुनबाई असून आमदार संग्राम जगताप यांच्या त्या पत्नी आहे. मागील निवडणुकीत आ. कर्डिले यांच्या दोन मुली सुवर्णा कोतकर व शितल जगताप या उभ्या होत्या. आता या निवडणुकीत ज्योती गाडे व शितल जगताप रिंगणात उरतल्या आहेत.

-Ads-

खा. दिलीप गांधी यांचा सुपुत्र सुवेंद्र गांधी प्रभाग क्रमांक 12 ब मधून भाजपच्या चिन्हावर उभे राहणार आहेत.
खा. गांधी यांच्या सुपुत्रासह यावेळी त्यांच्या सुनबाई दिप्ती गांधी या प्रभाग क्रमांक 12 ब मधून निवडणुक लढत असून महापौर सुरेखा कदम यांच्या विरोधात त्या उभ्या आहेत. याबरोबर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांचा सुपुत्र योगिराज गाडे हे प्रभाग क्रमांक 4 क म्हणून निवडणुक रिंगणात उतरले आहेत. तसेच उपमहापौर अनिल बोरूडे यांच्या पत्नी पुष्पा याही यंदा नशिब अजमावत आहेत. या निवडणुकीत मुलगी, सुन व सुपुत्रासाठी आ. कर्डिले, खा. गांधी व आ. जगताप यांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
19 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
3 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)