आ. शंभूराज देसाई यांच्या हस्ते मराठा दाखल्यांच्या वितरणाचा शुभारंभ

काळगाव – मराठा आरक्षण जाहीर झाल्यानंतर पाटण तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आ. शंभूराज देसाई यांच्या हस्ते पाटण उपविभागीय कार्यालयाच्या वतीने मराठा समाजाच्या दाखल्याचे वितरण करण्यात आले. मराठा समाजाच्या दाखल्यासाठी उपविभागीय कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करावा व मागणी होईल. त्याच दिवशी मराठा समाजाचे दाखले द्यावेत अशा सुचनाही आ. देसाई यांनी यावेळी केल्या.

यावेळी उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार रामहरी भोसले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रवींद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे संचालक बबनराव भिसे, नानासो पवार, बबनराव माळी, आयेशा सय्यद, विजयराव देशमुख आदींची उपस्थिती होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आ. देसाई म्हणाले, शासनाने नोकरीची महाभरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या महाभरतीमध्ये आपले मतदारसंघातील मराठा समाजातील युवकांना या दाखल्यांचा लाभ व्हावा याकरीता उपविभागीय कार्यालयात मराठा दाखला देण्यासंदर्भात स्वतंत्र कक्ष स्थापन करुन ही प्रक्रिया अधिक लोकाभिमुख करावी. तसेच भूकंपाच्या दाखल्यांची मागणी नोकर महाभरतीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात आपल्या तालुक्‍यात होणार आहे त्यामुळे भूकंपाचे दाखले देण्याची प्रक्रिया जलग गतीने ठेवावी, असेही आ. शंभूराज देसाई यांनी सांगितले. तालुक्‍यातील मराठा समाजातील युवकांनी लवकरात लवकर मराठा समाजाचे दाखले काढून ठेवावेत, असे आवाहनही त्यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)