आ. मकरंद पाटील यांचा वाढदिवस उत्साहात

आमदार मकरंद पाटील यांचा वाढदिवस साजरा करताना कवठे ग्रामस्थ (छाया : करुणा पोळ, कवठे.)

पूर्वसंध्येलाच वाढदिवस साजरा करून कवठेकरांनी द्विगुणीत केले प्रेम
कवठे, दि. 29 (प्रतिनिधी) – कवठे, ता. वाई येथे आ. मकरंद पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्याचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये कवठे येथे झालेल्या सभेमध्ये कवठे ग्रामस्थांच्यावतीने आमदार मकरंद पाटील यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला.
कवठे येथे गोकुळ तालमीच्या नूतन इमारतीचे उद्‌घाटन, जिम साहित्याचे पूजन, आशियाई महामार्ग ते विठ्ठलवाडी रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन, कवठे स्मशानभूमी शेडचे भूमिपूजन व त्यालगत असलेल्या बंधाऱ्याचे भूमिपूजन, कवठे व विठ्ठलवाडी येथे साकव पूल व बंधारे, विठ्ठलवाडी येथील स्मशानभूमी, मुकाईमंदिर सभामंडप, मेसुबाई मंदिर पेव्हर ब्लॉक इत्यादी 1 कोटी 9 लाखांच्या कामांचा भूमिपूजन कार्यक्रम आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते पार पडला.
आ. मकरंद पाटील म्हणाले, कवठे गावाने आपल्याला व तात्यांना भरभरून प्रेम दिले. आज पुन्हा कवठे गावातील कार्यकर्ते एकत्र आल्याने ते आपला इतिहास पुन्हा तालुक्‍यात उभा केल्याशिवाय राहणार नाहीत. सध्याची परिस्थिती ही दुष्काळी असून येत्या दोन महिन्यात वाई तालुक्‍याच्या या पूर्व भागाला भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. यासाठी कवठे-केंजळ योजना सुरु करावी लागेल. वाई व खंडाळा तालुक्‍याचा समावेश दुष्काळी तालुक्‍यात केला आहे. परंतु सध्याचे शासन पाणीपट्टी भरायला तयार नाही. त्यामुळे कवठे-केंजळची पाणीपट्टी आपापल्या गावाच्या वाट्याला येईल ती भरावी म्हणजे या योजनेचे पाणी सोडल्यास आपल्याला यंदाच्या दुष्काळावर काही अंशी मात करता येईल.
यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमात महादेव मसकर, प्रतापराव पवार, शशिकांत पिसाळ, सत्यजित वीर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन राहुल डेरे व उपसरपंच संदीप डेरे यांनी केले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र केसरी धनाजी फडतरे, गोरख सरक, उपमहाराष्ट्र केसरी चंद्रकांत सूळ, आबा सूळ, महाराष्ट्र चॅम्पियन राजेंद्र पवार, शाहू केसरी सतिश भिलारे, जागतिक विजेता विलास देशमुख, जिल्हा बॅंकेचे संचालक नितीन पाटील, शशिकांत पिसाळ, प्रतापराव पवार, मनोज पवार, सभापती रजनीताई भोसले, उपसभापती अनिल जगताप, राजेंद्र राजपुरे, बाजार समितीचे सभापती लक्ष्मणराव पिसाळ, खरेदी विक्री संघाचे चेअरमन शिवाजीराव पिसाळ, उपनगराध्यक्ष अनिल सावंत, जिल्हा परिषद सदस्या संगिता मस्कर, विजयसिंह नायकवडी, प्रमोद शिंदे, उदयसिंह पिसाळ, महादेव मसकर, शशिकांत पवार, उमा बुलुंगे, विक्रमसिंह पिसाळ, कुमार जगताप, शंकरराव पोळ, कृष्णराव पाटील, माधवराव डेरे, शिवाजी करपे, रामचंद्र डेरे, शिवाजी ससाणे, माजी सरपंच सुशीला डेरे, मधुकर डेरे, मारुती पोळ, राजेंद्र पोळ उपस्थित होते.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)