आ. पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक भारतीचा रविवारी मेळावा

शिक्षकांच्या महत्त्वाच्या सुमारे 35 प्रश्‍नांवर होणार चर्चा

नगर: महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती संघटनेच्या वतीने खालील प्रश्‍नासंदर्भात रविवार दि.6 जानेवारीला नंदनवन लॉन येथे सकाळी 11 वाजता भव्य मेळावा आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध प्रश्‍नासंदर्भात मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यास जिल्हाभरातुन शिक्षकांनी उपस्थित रहावे. तीन वेळा आमदार झालेले शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक प्रश्‍नांची सोडवणुक करावयाची आहे. अशी माहिती शिक्षक नेते सुनिल गाडगे व प्राथमिकचे राज्य उपाध्यक्ष दिनेश खोसे यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या मेळाव्यात अनुदानीत आश्रम शाळांना 100 टक्के अनुदान द्या, 2012 नंतर शाळेत रुजु झालेल्या शिक्षकांना शालार्थ आय.डी.देऊन तात्काळ पगार सुरु करा, डी.एड.बी.एड भारती सुरु करुन राज्यातील शिक्षक व प्राध्यापकांच्या रिक्त जागा त्वरीत भरा, नोकर कपात, कंत्राटीकरण आणि खाजगीकरण बंद करा, सरकारी व निमसरकारी नोकर भरती सुरु करा, विनाअनुदानित शाळा, ज्युनिअर व सीनिअर कॉलेज आणि आयटीआय यांना 100 टक्के अनुदान द्या, सर्वांना जुनी पेन्शन योजना लागु करा, विनाअट वरिष्ठ व निवड श्रेणी द्या, राज्यातील सर्वशाळांना मोफत वीज आणि आरटीइ प्रमाणे सर्व भौतिक सुविधा द्या, स्वयंअर्थशासित शाळा धोरण आणि शिक्षणाचे कंपनीकरण बंद करा, अंगणवाडी ताईंना पूर्व प्राथमिक शिक्षकांचा दर्जा देऊन वेतन द्या, वस्तीशाळा शिक्षकांची मुळ नियुक्ती दिनांकापासूनची सेवा वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी ग्राह्य धरावी, याव अन्य मागण्यांवर या मेळाव्यात चर्चाकेली जाणार आहे. शिक्षक भारतीचे राज्याचे अध्यक्ष अशोक बेलसरे, नेते सुनिल गाडगे यांच्या नेतृत्वाखाली मेळाव्यात पुढील आंदोलनाचे रुपरेषा व शिक्षाकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी कशी आंदोलने करायची यावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.

या मेळाव्याला कार्याध्यक्ष आप्पासाहेब जगताप, हनुमंत रायकर, सुदाम दिघे, शिवाजी बागल, उपाध्यक्ष शिवाजी सोसे, महिला कार्याध्यक्ष मिनाक्षी सुर्यवंशी,महिला राज्य प्रतिनिधी शकुंतला वाळुंज, जया गागरे, छाया लष्करे, उच्च माध्यमिक जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु, सचिव महेश पाडेकर ,कार्याध्यक्ष किशोर डोंगरे, माध्यमिकचे सचिव मोहम्मदसमी शेख, गजेंद्र कर्डिले, नवनाथ डोखे, मारुती कुसमुडे, बाबासाहेब साबळे, महादेव कराळे, जि.प.प्राथमिकचे राज्य उपाध्यक्ष दिनेश खोसे, माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लोंढे, शहर जिल्हाध्यक्ष प्रदिप रुपटक्के, विजय लंके, शरद धोत्रे, सुनिल जाधव, जिल्हा सचिव मोहम्मद समी शेख, अशोक धनवडे, जिल्हा महिलाध्यक्षा आशा मगर, सचिव विभावरी रोकडे, महानगर महिला अध्यक्षा माधवी भालेराव, बेबीनंदा लांडे, जयश्री ठुबे, मंजुषा गाडेकर, माधुरी सोनार,संध्या गावडे साधना शिंदे आदींनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)