आ. गजभिये यांच्यावर कारवाई करावी : पवार

शिरवळ – छत्रपती शिवाजी महाराज यांचा वेश परिधान करून घोर अपमान केल्याबद्दल आमदार गजभिये यांचे लोकप्रतिनिधित्व रद्द करावे, तसेच त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे खंडाळा तालुका कार्यवाहक गौरव पवार यांनी खंडाळा तहसिलदार यांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रवादीचे आमदार गजभिये यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा वेश परिधान करून सार्वजनिक ठिकाणी रामराजे नाईक – निंबाळकर या व्यक्तिपुढे झुकून मुजरा करण्याचा निंदनीय प्रकार केला.

या प्रकारे मुजरा करण्याचा प्रकार हा शिवभक्तांचा घोर अपमान आहे. पण जे छत्रपती औरंगजेब यांच्या दरबारातसुध्दा नतमस्तक झाले नाहीत, अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा वेश परिधान करून नेत्यांना मुजरा करण्याच्या निंदनीय घटनेचा आम्ही निषेध करीत आहोत. तरी शासनास विनंती आहे की, या घटनेची दखल घेऊन गजभिये यांचे लोकप्रतिनिधित्व रद्द करून त्यांच्यावर खटला दाखल करून जास्तीत जास्त शिक्षा करावी, असे खंडाळा तहसिलदार यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
5 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
2 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)