आ. कोल्हेंकडून उभारलेल्या बसथांब्याचे लोकार्पण

कोपरगाव  – आमदार स्नेहलता कोल्हे यांनी वाढदिवसाचे औचित्य साधुन सदगुरू गंगागिर महाराज महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी येवला रस्त्यावर बसथांबा उभारला असून त्याचा लोकार्पण विद्यार्थिंनीच्या उपस्थितीत आ. कोल्हे यांनी सोमवारी केला.
शिक्षणासाठी बसमधुन विद्यार्थी ये-जा करतात. या मुला-मुलींसाठी येवला रस्त्यावर बसथांबा शेडचे लोकार्पण सोमवारी केले आहे. यावेळी आ. कोल्हे म्हणाल्या, ग्रामीण भागातून येथील सदगुरू गंगागिर महाराज महाविद्यालात विद्यार्थी येतात.नगर-मनमाड महामार्गावर येवला रस्त्या येथे संगम बसथांब्यावर नियमीतपणे बस थांबावी व येथून दुरवर प्रवास करणाऱ्या मुला मुलींना थंडी ऊन पाउस वारा यापासून बचाव व्हावा, यासाठी हे बसथांबा उभारण्यात आला. त्याचे लोकार्पण आपल्या वाढदिवषी झाले. याचा मनस्वी अत्यानंद आहे. प्रारंभी सदगुरू गंगागिर महाराज महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य दत्तात्रय गाडे, उपप्राचार्य नानासाहेब देवकर यांनी प्रास्तविक करून आ. कोल्हे यांचा सत्कार केला. यावेळी उपनगराध्यक्ष विजय वाजे, विवेक सोनवणे आदींची भाषणे झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)