आ. कर्डिले जादूची कांडी नसून जिलेटीनची कांडी- राठोड

प्रशासनावर दबाव आणून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न

नगर – शहर दहशतमुक्‍त करण्याचा आमचा निर्धार असून, आम्ही सत्तेच्या माध्यमातून नगर शहराचा विकास केला आहे, भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले हे जादूची कांडी नसून, ही तर जिलेटीनची कांडी असल्याची टीका शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी पत्रकार परिषदेत केली.

या पत्रकार परिषदेस संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर, जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, घनश्‍याम शेलार, रूपेश पाटील, विक्रम राठोड आदी उपस्थित होते. राठोड म्हणाले, आ. कर्डिले जादूची कांडी असल्याचे मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. मात्र ते जादूची कांडी नसून जिलेटीनची कांडी असल्याचा आरोप करून राठोड म्हणाले, शाश्‍वत विकास काय आहे, हे शिवसेनेने दाखवून दिले आहे.

भाजप-कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांच्याकडे कोणतेच मुद्दे नसल्यामुळे त्यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोसोबत आता कोणाकोणाचे फोटो लागले आहेत, हे भाजपने पहायला हवे, जनतेला ह सर्व समजले आहे. त्यामुळे कोणाला बरोबर घेऊन हे चालले आहेत, हे आता सांगण्याची आवश्‍यकता नाही. महापालिकेमध्ये शिवसेनेने केलेल्या विकासांमुळे जनता आता शिवसेनेबरोबर आहे. निश्‍चितच पालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रशासनावर दबाव आणून एक प्रकारे सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न नगर शहरामध्ये सुरू असल्याचा आरोप कोरगावकर यांनी यावेळी केला.

गाडे म्हणाले, बेळगावमध्ये कॉंग्रेसचे गुंड भाजपमध्ये घेतले. आम्ही भयमुक्‍तीचा नारा दिला होता. तो खऱ्या अर्थाने सार्थ ठरला आहे. शिवसेनेची स्वबळावर सत्ता येणार आहे. आमदार शिवाजी कर्डिले यांनी प्रभाग 4 मधून सर्व भाजपचे उमेदवार निवडून आणून दाखवावेत, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)