आहे मनोहर तरी…

‘अस्मिता’च्या वाचकांना माझा पुन्हा एकदा नमस्कार. जेव्हा एखादे पुस्तक आपण वाचत असतो त्यावेळी खरं तर त्या लेखकाबद्दलही आपल्याला जाणून घ्यावेसे वाटले तर आश्‍चर्य काहीच नाही… आणि त्यात तो जर विनोदी लेखक असेल तर मग तर तो घरात कसे वागत असेल… बाहेरही विनोदी असेल का? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात… मला तरी निदान पडत असत… आणि त्यांच्याबद्दल जर खुद्द त्यांची बायको काही सांगत असेल तर काय मजा येईल वाचायला.. तर अश्‍याच विनोदी लेखक पु. ल देशपांडे यांच्या पत्नी सुनीताबाई देशपांडे लिखित “आहे मनोहर तरीही’ या पुस्तकाबद्दल आज मी आपणास माझा अभिप्राय सांगणार आहे…

सुनीताबाई यांनी आपल्या बालपणापासूनच्या जीवनाविषयी यात सांगितले आहे त्या खूप धाडसी आणि पुढारलेल्या विचारसरणीच्या होत्या असे लिखाणातून जाणवते… त्या काळात त्यांनी स्वातंत्रलढ्यात सहभाग घेतला होता अगदी घरच्यांच्या विरोधात जाऊन. हातचे काहीही राखून न ठेवता अगदी त्यांनी आपल्या आई वडील. तसेच त्यांच्या मित्राबद्दल त्यांना वाटलेल्या हळूवार भावना सांगण्याचे जे धाडस केलेले आहे ते अगदी कौतुकास्पद आहे.

प्रेम म्हणजे लग्नच असे काही नाही. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याइतक्‍या त्या स्वतंत्र विचाराच्या होत्या पण खरे तर पु. लं. यांच्या आग्रहाखातर त्या कश्‍या लग्नाला तयार झाल्या याचे किस्से त्यांनी सांगतले आहेत. पु. लं. चा स्वभाव. दोघांचा संसार. वाईट, तापट नवऱ्यासोबत संसार करताना निदान त्या स्त्रीला लोकांची सहानभूती तरी असते. पण नवरा खूपच चांगला असला तर कश्‍याप्रकारे तिला अनुभव येतात अश्‍या छान गमतीजमती लेखिकेने सांगितल्या आहेत. पुस्तक छान वाटले मला. अगदी मनमोकळे लिखाण आहे. वाचताना खूप मजा येते आणि शेवटी नवरे सगळे सारखेच याचा अनुभव येतो.

मनिषा संदीप


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)