आस्थेची दिवाळी पहाट साताऱ्याच्या कचरा वेचकांसोबत..

सातारा, दि. 6 – गेली चार वर्षे आस्था सामाजिक संस्था दिवाळीची पहाट हा उपक्रम सातारा शहर व परिसरातील कचरा वेचकांबरोबर साजरा करत आहे. “स्वच्छ सातारा सुंदर सातारा’ या संकल्पनेला वास्तवात आणतात हे कचरा वेचक. त्यांना स्वच्छता दूत असे सबोधने योग्य ठरेल.त्यांच्या हातांना प्रेमाची, आपुलकीची ऊब नेहमीच आस्था विविध मान्यवर पाहुण्याच्या उपस्थितीत देत असते. या वेळी आस्था संस्था व सह्याद्री देवराई सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राजवाडा येथे कार्यक्रमाचे आयोजन केले. या वेळी उपसचिव वित्तविभाग मंत्रालय वैभव राजेघाडगे, सातारा नागरपरिषद मुख्याधिकारी शंकर गोरे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विजयकुमार निंबाळकर यांनी कचरा वेचक यांच्या सोबत करत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. वैभव राजेघाडगे यांनी मार्गदर्शन करताना कचरा वेचकांच्या दृष्टीने आवश्‍यक असलेल्या आरोग्य विमा, महात्मा फुले जनस्वास्थ्य योजनांची माहिती दिली. तसेच कचरा वेचक व आस्था संस्थेला सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. मुख्याधिकारी शंकर गोरे म्हणाले, कचरा वेचकाना सातारा नगरपरिषदेच्या वतीने कायमस्वरूपी रोजगार मिळण्याच्या दृष्टीने व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या मध्ये आरोग्य तपासणी करणे याकसोबतच कचरा डेपो येथील नव्याने सुरु होणाऱ्या प्रकल्पात समाविष्ट करून घेणार असल्याचेही सांगितले.
नित्यवर्षी प्रमाणे कचरा वेचकाना दिवाळी सणासाठी उपयुक्त अश्‍या वस्तू व फराळ याचे वाटप उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते केले. याकरीता कन्हेयालाल राजपुरोहित यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमात या वेळी सह्याद्री देवराई संस्थेचे सचिव मधुकर फल्ले यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील भोसले, गुरुनाथ जाधव, प्रकाश भिसे, जनार्दन निपाणे, हेमंत दरेकर, पंकज मुंदडा, वसुंधरा निंबाळकर, शुभम बाबर,राजू वायदंड़े, रामदास चव्हाण यांनी परिश्रम घेतले

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)