आसू परिसरात वन्य प्राण्याचा वावर

सात शेळ्या फस्त केल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट

फलटण, दि. 2 (प्रतिनिधी) – फलटण तालुक्‍यातील आसू परिसरातील फुले वस्ती, गोसावी वस्ती, निंबाळकर वस्ती, डांगे वस्ती, शिंदेनगर या भागातील शेतकऱ्यांची पाच ते सहा कुत्री सहा ते सात शेळ्या हिंस्र प्राण्याने फस्त केल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून बिबट्या, तरस दृश्‍य प्राण्याचा वावर वाढला असून शेतकरी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे वन्यप्राणी दिवसभर उसात बसून रात्री घराशेजारील कुत्री व शेळ्यांनवर हल्ला करत आहे. याबाबतची कल्पना सामाजिक कार्यकर्ते दशरत फुले यांनी वन अधिकारी तसेच फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनला दिली असून या प्राण्यांच्या पायाचे ठसे वन अधिकाऱ्यांने नेले आहेत. याचा ताबडतोब बंदोबस्त व्हावा, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)