आसू परिसरात बिबट्याची शक्‍यता

नागरिकांनी दक्षता घ्यावी आवाहन

आसू, दि. 6 (वार्ताहर) – फलटण तालुक्‍याच्या पूर्व भागातील आसू परिसरातील फुले वस्ती, गोसावी वस्ती, निंबाळकर वस्ती, शिंदेनगर परिसरात गेल्या पंधरवड्यापासून हिंस्त्र प्राण्याने घुमाकूळ घातला अनेक शेळ्या, कुत्री कोंबड्यांचा फडशा पाडला आहे. यामुळे भागात बिबट्या असण्याची शक्‍यता व्यक्त होत असून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.
आसू परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास पाळीव प्राण्यांवर हल्ला करून फस्त केले जात आहे. हल्ला करणारे प्राणी अद्याप नागरीकांचे निर्दशनास न आल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. पाच कि.मी अंतराच्या परिसरातील आतापर्यंत आठ-दहा शेळ्या, सहा-सात कुत्री, कोंबड्या मारून फडशा पाडला आहे. यामुळे शेतीपिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांनी बिबट्याचा धसका घेतला आहे. परिसरातून शालेय विद्यार्थी आसू, शिंदेवाडी, पवारवाडी व बाहेरगावी जात असतात. त्यांच्यामध्येही भितीचे वातावरण आहे. आसू परिसरात नुकतेच वनाधिकारीनी संबंधीत प्राण्यांच्या पायाचे ठसे घेवून वरीष्ठांकडे पडताळणीला पाठवले होते. हे ठसे बिबट्याचे असल्याचे निर्देशास आले असल्याचे समजते. याबाबत नागरिकांनी, महिलांनी विशेषतः लहान मुलांची काळजी घ्यावी. परिसरात आणि वाडी वस्तींवर दवंडी देण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. वावर आलेल्या परिसरात कॅमेरे लावण्यात येणार आहेत. याबाबत याचा लवकरच छडा लावण्यात येईल, नागरीकांनी घाबरून जावू नये असे आवाहन सबंधीतांनी केले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)