आसिया बिबीच्या निर्दोष मुक्‍ततेविरोधात पाकिस्तानमध्ये निदर्शने 

आसिया बिबी पाकिस्तानबाहेर स्थलांतर करणार 

इस्लामाबाद: इशनिंदेच्या आरोपातून आसिया बिबी या ख्रिश्‍चन महिलेच्या निर्दोष मुक्‍तता होण्याविरोधात पाकिस्तानात कट्टरवाद्यांनी निदर्शनांना प्रारंभ केला आहे. आसिया बिबीना ठार मारण्याच्या धमक्‍याही दिल्या जाऊ लागल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आसिया बिबीला 2010 साली इशनिंदेच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले होते. आसिया बिबी यांनी नेहमीच आपण निर्दोष असल्याचे म्हटले होते. गेल्या आठ वर्षांपासून त्या तुरुंगातच होत्या. सत्र न्यायालयाने तिला दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यावर लाहोर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तबही केले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने आसिया बिबीना निर्दोष मुक्‍त करण्याचे आदेश दिले आहेत. त्या निर्णयाविरोधात तेहरीक ए लबाइक पाकिस्तान या कट्टर इस्लामी राजकीय पक्षाच्या नेतृत्वाखाली अन्य पक्षांनी देशभर निदर्शने केली. देशाच्या वेगवेगळ्या भागात रस्ते वाहतूक अडवण्यात आली.

या घडामोडींमुळे आसिया बिबी यांच्या जीवाला धोका असल्याने त्यांच्या कुटुंबाने पाकिस्तानबाहेर स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. आसिया यांचे पती अशिक मसिह हे ब्रिटनहून पाकिस्तानला परतले असून त्यांनी स्थलांतराची तयारी करायला केली आहे. मसिह यांना पूर्ण सुरक्षा पुरवण्यात आली आहे. आसिया बिबी पाकिस्तानबाहेर कोठे जाणार हे मात्र अद्याप निश्‍चितपणे समजू शकलेले नाही. सुरक्षिततेच्या कारणास्तव हे ठिकाण गुप्त ठेवण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)