आसाराम समर्थक हिंसाचार घडवून आणू शकतात – जोधपूर पोलिस

नवी दिल्ली : हरयाणातील पंचकुला येथे बाबा राम रहिमला न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर त्याच्या भक्तांनी मोठा हिंसाचार घडवला होता. स्वयंघोषित संत आसाराम बापूच्या भक्तांकडूनही अशी परिस्थिती निर्माण केली जाऊ शकते, त्यामुळे बलात्कारप्रकरणी आसारामच्या खटल्यावर तुरुंगातील न्यायालयातच सुनावणी घेतली जावी, अशी मागणी करणारी याचिका जोधपूर पोलिसांनी राजस्थान उच्च न्यायालयात केली होती, यावर आज सुनावणी झाली.

पुढील आठवड्यात २५ एप्रिल रोजी आसाराम प्रकरणावर न्यायालय आपला निर्णय देणार आहे. त्यामुळे पोलिसांनी न्यायालयाकडे मागणी केली की, जर शक्य असेल तर २५ ऐवजी १७ तारखेलाच या प्रकरणावर निकाल देण्यात यावा. पोलिसांना संशय आहे की, २५ तारखेसाठी आसारामचे समर्थक पहिल्यापासूनच हिंसाचार घडवून आणण्याची योजना तयार करीत आहेत. अशा वेळी जर निकाल आगोदरच देण्यात आला तर कायदा सुव्यवस्था मोठ्या प्रमाणावर बिघडण्यापासून वाचवता येईल. यावेळी न्यायालयाने आसारामच्या वकिलांकडून आज लिखित उत्तर मागवले होते.गेल्या वर्षी पंचकुलामध्ये राम रहिमच्या प्रकरणामध्ये कोर्टाच्या निकालानंतर हरयाणा, पंजाब आणि चंडीगड येथे मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला होता. त्याचप्रमाणे राजस्थानातही होण्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. अशात जर उच्च न्यायालयाच्या बाहेर गर्दी जमा झाली तर पोलीस प्रशासनासाठी कायदा सुव्यवस्था कायम राखणे अवघड होऊ शकते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)