आसाराम दोषी ठरल्याने आम्हाला न्याय मिळाला- पीडित मुलीचे वडील

जोधपूर : अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी जोधपूर मध्यवर्ती विशेष न्यायालयाने आज आसाराम बापूला दोषी ठरवले. न्यायालयाने आसाराम बापूला दोषी ठरवल्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी न्यायालयाच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे. तसेच न्यायालयाचे आणि माध्यमांचे आभार मानले आहेत. आसाराम बापूला दोषी ठरवल्याने आम्हाला न्याय मिळाला आहे. आता त्याला कडक शिक्षा होईल अशी आम्हाला आशा आहे. या शिक्षेद्वारे या प्रकरणातील ज्या साक्षीदारांची हत्या झाली तसंच जे बेपत्ता आहेत त्यांना न्याय मिळावा ही इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया पीडित मुलीच्या वडिलांनी दिली आहे.

31 ऑगस्ट 2013 पासून आसाराम बापू जोधपूर तुरुंगात आहे. उत्तर प्रदेशच्या शहाजहाँपूर येथील असलेल्या आणि आसाराम बापूच्या मध्य प्रदेशातील छिंदवाडातील आश्रमात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून आसारामला अटक करण्यात आली होती. आसारामने जोधपूरजवळ असलेल्या मनाई भागातील आश्रमात बोलावून 15 ऑगस्ट 2013 च्या रात्री बलात्कार केल्याचा आरोप मुलीने केाल होता. मुलीच्या तक्रारीनंतर आसारामला इंदूरहून अटक करण्यात आली होती. इंदूरहून अटक झाल्यानंतर 1 सप्टेंबर 2013 रोजी जोधपूरला आणण्यात आलं. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)