आसाराम खटल्याबद्दल सुप्रिम कोर्टाचा गुजरात सरकारला सवाल

नवी दिल्ली – आसारामबापुच्या विरोधातील बलात्काराच्या खटल्याच्या सुनावणीतील संथपणाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारवर प्रश्‍न चिन्ह उपस्थित केले आहे. न्या एन व्ही रामण्णा आणि न्या अमित्व रॉय यांनी या प्रकरणातील पीडितांचीही साक्ष अजून का नोंदवली गेली नाही असा सवाल राज्य सरकारला केला आहे. या प्रकरणी प्रतिज्ञापत्राद्वारे आपले म्हणणे सादर करावे अशी सुचना सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला केली आहे.

आसाराम याच्यावरील आरोपांच्या संबंधातील साक्षी पुरावे नोंदवण्याचे काम वेगाने पुर्ण करावे अशी सुचना सर्वोच्च न्यायालयाने गेल्या 12 एप्रिल रोजी ट्रायल कोर्टाला केली होती पण या कामात अद्याप म्हणावी तशी प्रगती झालेली नाही. सरकारी पक्षाच्या एकूण साथीदारांपैकी 46 जणांच्या साक्षी नोंदवून घेण्याचे काम अद्याप अपुर्ण असून ते त्वरीत मार्गी लावावे अशी सुचनाही सुप्रिम कोर्टाने केली आहे.

आसाराम यांच्या विरोधात राजस्तान आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये स्वतंत्र खटले सुरू आहेत. या प्रकरणात जामीन मिळावा यासाठी आसाराम यांच्यावतीने विविध कारणे पुढे करून अर्ज करण्यात आला होता तो अर्ज सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा नाकारला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)