आसारामला शिक्षा ऐकून रडू कोसळले…

जोधपूर : लैंगिक अत्याचार प्रकरणी आसारामला जोधपूर न्यायालयाने दोषी ठरवले. त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तर अन्य दोन आरोपींना २० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावले सुनावली. जोधपूर विशेष न्यायालयाने सुनावलेला निकाल ऐकताच आसारामला ढसाढसा रडू कोसळले.

न्यायाधीश मधुसूदन शर्मा यांनी आसारामला जन्मपेची शिक्षा सुनावली. हा निकाल ऐकताच आपले डोके धरुन रडू लागला. हरी ओम हरी ओम मंत्राचा जप करत होता. शिक्षा सुनावताच आसाराम डोके धरुन खाली बसला आणि धाय मोकलून रडू लागला. न्यायाधीश निकालाचे वाचन करत होते, तेव्हा आसाराम सहआरोपी शरद आणि शिल्पी यांच्या खांद्यावर हात ठेवून उभा होता. कोर्टाचा निकाल समोर आल्यानंतर आसारामची तब्येत बिघडल्याची गोष्टही समोर आली आहे. तुरुंग परिसरात रुग्णवाहिका आली असल्याचे सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)