आसारामला जन्मठेप; अन्य दोघांना 20-20 वर्षे शिक्षा

जोधपूर : गेल्या 1 हजार 667 दिवस जोधपूर सेंट्रल जेलमध्ये असलेला आसाराम अल्पवयीन मुलीवरील बलात्काराप्रकरणात दोषी ठरला आहे. जोधपूर SC आणि ST न्यायालयाने, आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर याप्रकरणातील दुसरे आरोपी शरद आणि शिल्पी यांना 20-20 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

जोधपूर न्यायालयाने आज सकाळीच आसारामसह शरद आणि शिल्पी या तिघांना दोषी ठरवले. तर प्रकाश आणि शिवा या दोन आरोपींना निर्दोष ठरवण्यात आले. एकूण पाच आरोपींबाबत न्यायालयाने आज निर्णय दिला. 6 नोव्हेंबर 2013 रोजी पोलिसांनी आसाराम आणि त्याचे सहकारी शिवा, शिल्पी, शरद आणि प्रकाश यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं. आसारामविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत, जुवेनाईल जस्टिस्ट अर्थात अल्पवयीन न्याय आणि आयपीसीच्या अन्य कलमांअतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

-Ads-

हा निकाल येण्याआधीच दिल्लीपासून जोधपूरपर्यंत सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. जोधपूरला तर छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. राम रहीमचा निकाल आल्यानंतर ज्याप्रकारे त्याच्या अनुयायांनी दिल्लीसह अनेक ठिकाणी हैदोस घातला, तशीच परिस्थिती यावेळीही होण्याची शंका पोलिसांना आहे. आसाराम दोषी ठरल्यास त्याचे समर्थक गोंधळ घालू शकतात अशी शक्यता वर्तवली जात होती.

मुलीच्या आरोपानुसार, “15 आणि 16 ऑगस्ट 2013 च्या रात्री जोधपूरच्या एक फार्म हाऊसमध्ये आसाराम बापूने उपचाराच्या बहाण्याने लैंगिक शोषण केले होते.  दिल्लीच्या कमलानगर पोलिस स्टेशनमध्ये 19 ऑगस्ट 2013 रोजी आसारामविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)