आसारामचे कोट्यवधीचे साम्राज्य सांभाळतेय “भारती’

जोधपूर – अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी आसारामला आजन्मठेपेची शिक्षा सुनाविण्यात आली. तर त्याचा मुलगा नारायण साई देखील सुमारे चार वर्षांपासून सूरतच्या कारागृहात कैद आहे. आसाराम आणि नारायण साई कारागृहात आहेत, पण त्याचे जगभरातील 400 आश्रम आणि कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचे साम्राज्य अजूनही कायम आहे. आता हे साम्राज्य त्याची मुलगी भारती सांभाळत आहे.

जगभरात आसारामचे सुमारे 400 पेक्षा जास्त आश्रम आणि 40 शाळा आहेत. आता याचा सर्व कारभार भारतीच्याच हाती सोपविण्यात आला आहे. आसारामच्या अटकेननंतर वडिलांच्या विश्वासू सहकाऱ्याच्या मदतीने भारती आसाराम ट्रस्ट चालवत आहे.

“संत श्री आसारामजी ट्रस्ट’ची धर्मादाय संस्था म्हणून नोंद आहे. याचे मुख्यालय अहमदाबादमध्ये आहे. इथेच आसारामने पहिल्या आश्रमाची स्थापना केली होती. देशातील सर्वच राज्यात पसरलेले आश्रम भारतीच सांभाळत आहे.
दरम्यान, सूरतमधील दोन बहिणींवरील बलात्कारप्रकरणी आसाराम, त्याचा मुलगा नारायण साई यांच्यासोबत त्याची मुलगी भारती आणि त्याची पत्नी लक्ष्मीलाही आरोपी बनवण्यात आले होते. मात्र, भारती आणि लक्ष्मी जामीनावर बाहेर आहेत.

पीडित मुलींच्या माहितीनुसार, भारती मुलींना गाडीत बसवून सोडायला जात असे आणि घेऊनही येत असे. तर आसाराम भारतीला फोन करायचा आणि ती गाडीतून मुलींना आणायची. तसेच आसारामची पत्नी लक्ष्मीही मुलींना आश्रमातून पाठवत असे.

याचाच अर्थ भारती आणि तिची आई आसाराम आणि नारायण साईच्या कथित सेक्‍स रॅकेटमध्ये सहभागी आहेत. दोघीही त्यांच्यासाठी मुलींना तयार करायच्या. आसाराम आणि नारायण साई तुमचे कल्याण करतील, असे सांगून फूस लावत असत. सूरतच्या बहिणींच्या आरोपांनंतर भारती दिसलेली नाही. ती फरार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र या प्रकरणावर अद्याप न्यायालयाचा निकाल येणे बाकी आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)