आसारामचे अब्जावधीचे साम्राज्य आता ‘या’ महिलेच्या हाती

जोधपूर : अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा झाली असून त्याचा मुलगा नारायण साईदेखील सूरतच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. आसाराम आणि नारायण साई यांचे देशभरातील 400 आश्रम आणि अब्जावधींची संपत्ती अजूनही कायम आहे. आता आसारामचे अब्जावधीचे साम्राज्य त्याची मुलगी भारती सांभाळत आहे.
देशभरात आसारामचे 400 पेक्षा जास्त आश्रम आणि 40 शाळा सुरु आहेत. आता हे संपूर्ण नेटवर्क भारतीच्याच हाती आहे. आसारामच्या अटकेननंतर वडिलांच्या विश्वासू सहकाऱ्याच्या मदतीने भारती आसाराम ट्रस्ट चालवत आहे.

‘संत श्री आसारामजी ट्रस्ट’ची धर्मादाय संस्था म्हणून नोंद आहे. याचे मुख्यालय अहमदाबादमध्ये आहे. इथेच आसारामने पहिल्या आश्रमाची स्थापना केली होती. देशातील सर्वच राज्यात पसरलेले आश्रम भारतीच सांभाळत आहे. सूरतमधील दोन बहिणींवरील बलात्कारप्रकरणी आसाराम, त्याचा मुलगा नारायण साई यांच्यासोबत त्याची मुलगी भारती आणि त्याची पत्नी लक्ष्मीलाही आरोपी बनवण्यात आले होते.

पीडित मुलींच्या माहितीनुसार, भारती मुलींना गाडीत बसवून सोडायला जात असे आणि घेऊनही येत असे. तर आसाराम भारतीला फोन करायचा आणि ती गाडीतून मुलींना आणायची. तसेच आसारामची पत्नी लक्ष्मी मुलींना आश्रमातून पाठवत असे. याचाच अर्थ भारती आणि तिची आई आसाराम तसेच तिचा मुलगा नारायण साईच्या कथित सेक्स रॅकेटमध्ये साखळीचे काम करत होत्या. दोघीही त्यांच्यासाठी मुलींना तयार करायच्या. आसाराम आणि नारायण साई तुमचे कल्याण करतील, असे सांगून आई-मुलगी त्यांना तयार करत असत. सूरतच्या बहिणींच्या आरोपांनंतर भारती दिसलेली नाही. ती फरार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र या प्रकरणावर अद्याप न्यालायाचा निकाल येणे बाकी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)