आसारामची सहकारी शिल्पीला जामीन

जोधपुर – लैंगिक छळाच्या आरोपाखाली वादग्रस्त अध्यात्मिक गुरू आसाराम याच्या बरोबरच अटक करण्यात आलेली त्याची सहकारी संचिता गुप्ता उर्फ शिल्पी हिला राजस्थान उच्च न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे. आसाराम बरोबरच तिलाही 20 वर्षाच्या कारावासाची शिक्षा ट्रायल कोर्टाने सुनावली आहे. तिने राजस्थान उच्च न्यायालयात या शिक्षेच्या निकालाला आव्हान दिले आहे.

तथापी तिची 2 लाख रूपयांचा बॉंड आणि प्रत्येकी एक लाख रूपयांच्या दोन जामीनावर सुटका करण्याचा आदेश आज हायकोर्टाने दिला आहे. तिच्या वकिलांनी ही माहिती दिली. उच्च न्यायालयात तिने दाखल केलेल्या आव्हान याचिकेचा निर्णय होईपर्यंत तिला ट्रायल कोर्टाने दिलेली शिक्षा स्थगित करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे. या खटल्यात ट्रायल कोर्टाने आसारामला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)