आसाम बॉंबस्फोट प्रकरणात 15 दोषी

गुवाहाटी (आसाम) – सन 2008 मध्ये आसाममध्ये झालेल्या बॉंबस्फोट मालिका प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निकाल दिला आहे. या प्रकरणात 15 जणांना दोषी ठरवण्यात आले असून दोषींमध्ये एनडीएफबीचा (नॅशनल डेमॉक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलॅंड) प्रमुख रंजन दैमारी याचाही समावेश आहे.

2008 साली झालेल्या या बॉंबस्फोट मालिकेत 88 लोक मारले गेले होते. सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती अपरेश चक्रवर्ती यांनी रंजन दैमारी आणि अन्य 14 जणांना आयपीसीच्या विविध कलमांखाली दोषी जाहीर केले आहे. या 14 जणांमध्ये जॉर्ज बोडो, बी थरई, राजू सरकार, नीलिम दैमारी, अंचाई बोडो, इंद्र ब्रह्मा, लोको वासुमतारी, खड्‌गेशवर बासुमतारी, मृदुल गोयारी, माथुराम ब्रह्मा, आणि राजेश गोयारी यांचा समावेश आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

30 ऑक्‍टोबर 2008 रोजी गुवाहाटी, कोकराझार, बोंगई गाव आणि बारपेटा येथे बॉंबस्फोट घडवून आणले होते. या बॉंबस्फोटात 88 जण ठार झाले होते आणि 500 पेक्षा जास्त जण जखमी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)