आसामात पाचवीच्या मुलीला बलात्कार करून पेटवले

गुवाहाटी – आसामात इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकत असलेल्या मुलीवर सामुहिक बलात्कार करून नंतर तिला पेटवून दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात ही मुलगी 90 टक्के इतकी भाजली असून ती सध्या रूग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. मध्य आसाम मधील नागाव जिल्ह्यात हे प्रकरण घडले. एकूण तीन जणांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यातील दोन मुले अल्पवयीन आहेत. या तीन पैकी दोन जणांना अटक करण्यात आली असून तिसरा आरोपी फरारी आहे. यातील मुख्य आरोपीचे नाव झाकीर हुसेन असे आहे तो 21 वर्षांचा आहे. त्यानंतर दोन अल्पवयीन साथीदारांनीही तिच्यावर बलात्कार केला आणि तिघांनी तिला पेटवून दिले.

ही मुलगी शाळेतून घरी आल्यावर एकटीच होती. तिचे आईवडिल कामाला गेले होते ही संधी साधून आरोपी तिच्या घरात घुसले आणि तेथे त्यांनी हे अघोरी कृत्य केले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. यातील मुख्य आरोपी झाकीर याच्या कुटुंबियांचे त्या मुलीच्या कुटुंबियांशी वाद होते त्या वादातून हा प्रकार करण्यात आला असावा असा कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे. याच जिल्ह्यात मागच्याच आठवड्यात एका 35 वर्षीय महिलेवर आठ जणांनी बलात्कार केल्याची घटना घडली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)